सुमोनाच्या वडिलांना रिक्षाचालकाकडून जबर मारहाण; ‘या’ क्षुल्लक कारणावरून झाला वाद!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2017 18:09 IST2017-10-17T12:39:53+5:302017-10-17T18:09:53+5:30

Sumon's father raped by rickshaw driver; 'This' happens due to trivial reasons! | सुमोनाच्या वडिलांना रिक्षाचालकाकडून जबर मारहाण; ‘या’ क्षुल्लक कारणावरून झाला वाद!

सुमोनाच्या वडिलांना रिक्षाचालकाकडून जबर मारहाण; ‘या’ क्षुल्लक कारणावरून झाला वाद!

मेडियन कपिल शर्मा याची आॅनस्क्रीन पत्नी सुमोना चक्रवर्ती हिचे वडील सुजीत चक्रवर्ती (५६) यांच्याबरोबर काही दिवसांपूर्वीच एक मोठी घटना घडली.  होय, अंधेरी परिसरात एका आॅटोरिक्षाचालकाने त्यांच्याशी हातापाई करताना त्यांना गंभीर जखमी केले. रिक्षाचालकाच्या या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने बराचसा रक्तस्त्राव झाला. यावेळी सुमोनाची आई त्यांच्यासोबत असल्याने त्यांनी लगेचच त्यांना रुग्णालयात दाखल केले. रिक्षा भाड्यावरून हा वाद झाल्याची माहिती समोर येत आहे. 

या प्रकरणी सुमोनाने दिलेल्या माहितीनुसार, ‘मी आणि माझा परिवार अंधेरी येथील सेवन हिल्स हॉस्पिटलजवळ राहतो. काही दिवसांपूर्वी माझ्या आईची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे पापा तिला रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र एकही आॅटोरिक्षाचालक हॉस्पिटल परिसरात जाण्यास तयार नव्हता. बºयाच वेळानंतर एक रिक्षा त्यांच्याजवळ थांबली आणि हॉस्पिटलला जाण्यास तयार झाला. मात्र तो यासाठी जास्त पैसे मागत होता. 



सुमोनाने पुढे सांगितले की, रिक्षा भाड्यावरून पापा आणि रिक्षाचालकामध्ये वाद झाला. रिक्षाचालक खूपच आक्रमक झाल्याचे पाहून माझ्या वडिलांनी माघार घेत प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. परंतु रिक्षाचालक ऐकण्यास तयार नव्हता. त्याने आजूबाजूला असलेल्या दगडाने माझ्या वडिलांना मारण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांना जोरदार मुक्का मारून जमिनीवर पाडले. या मारहाणीत त्यांना खूपच गंभीर दुखापत झाली. त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर आईने आरडाओरड करीत एका कारवाल्याला थांबविले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेले. 



दरम्यान, या प्रकरणी पवई पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, रिक्षाचालकाला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण नेमके कशावरून घडले याबाबतचा पोलीस तपास करीत आहेत. यासाठी डॉक्टरांचे रिपोर्ट मागविण्यात आले आहेत. 

Web Title: Sumon's father raped by rickshaw driver; 'This' happens due to trivial reasons!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.