सुमेध बनणार कृष्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2016 13:03 IST2016-06-30T07:33:07+5:302016-06-30T13:03:07+5:30
राधा-कृष्ण यांची प्रेमकथा सगळ्यांनाच आवडते. याच प्रेमकथेवर आधारित राधा कृष्ण ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेची निर्मिती ...

सुमेध बनणार कृष्ण
र धा-कृष्ण यांची प्रेमकथा सगळ्यांनाच आवडते. याच प्रेमकथेवर आधारित राधा कृष्ण ही मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेची निर्मिती धीरज कुमारची क्रिएटिव्ह आय ही प्रोडक्शन कंपनी करणार होती. पण आता स्वस्तिक पिक्चर या मालिकेची निर्मिती करणार आहे. धीरज कुमार निर्माते असताना प्रतिका राव राधाची भूमिका साकारणार होती. तर छोट्या राधाच्या भूमिकेत तुनीषा शर्मा झळकणार होती तर कंसाची भूमिका साकारण्यासाठी अविनेश रेखीची निवड करण्यात आली होती. पण प्रोडक्शन हाऊस बदलल्यामुळे कलाकारही बदलण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे. अशोका मालिकेत सुशीमची भूमिका साकारणारा सुमेध मुडगलकर राधा कृष्ण या मालिकेत छोट्या कृष्णाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे.