सुलेखा तळवळकर हिची लेक तिच्यासारखीच सुंदर, जाणून घ्या तिच्याबाबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 16:14 IST2021-07-02T16:13:39+5:302021-07-02T16:14:14+5:30

सुलेखा तळवलकरची मुलगीही तिच्यासारखीच सुंदर दिसते. सध्या सोशल मीडियावर माय लेकींचे फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स मिळताना पाहायला मिळते.

Sulekha Talwalkar Daughter Look As Gorgeous As Her Mother, Know About Her | सुलेखा तळवळकर हिची लेक तिच्यासारखीच सुंदर, जाणून घ्या तिच्याबाबत

सुलेखा तळवळकर हिची लेक तिच्यासारखीच सुंदर, जाणून घ्या तिच्याबाबत

एकाहून एक धमाकेदार भूमिकेतून मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणा-या सुलेखा तळवळकर सध्या प्रचंड चर्चेत आहे. 'माझा होशील ना' मालिकेत साकारलेली तिच्या भूमिकेलाही रसिकांची पसंती मिळाली होती. मालिकेतून एक्झिट घेतल्यानंतर चाहते तिला विसरलेले नाहीत. तिच्याविषयी जाणून घेण्यात तिच्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता असते. सोशल मीडियावर सुलेखा प्रचंड सक्रीय असते. मालिका आणि विविध प्रोजेक्टस, खासगी आयुष्यातील खास क्षण चाहत्यांसह शेअर करत असते. सुलेखाने मुलीसोबतही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सुलेखाची मुलगीही तिच्यासारखीच सुंदर दिसते. सध्या सोशल मीडियावर माय लेकींचे फोटोंना भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स मिळताना पाहायला मिळते. सुलेखा यांची वेगळी ओळख करुन द्यायला नको.सुलेखा यांनी अंबर तळवलकरसह लग्न केले आहे.अंबर तळवलकर हा स्मिता तळवलकर यांच्या मुलगा आहे. सुलेखा दिवंगत स्मिता तळवलकर यांच्या सून आहेत. 

अंबर आणि सुलेखा यांना दोन मुलं आहेत. आर्य आणि टिया अशी मुलांची नावं आहेत. प्रत्यक्ष जीवनात टिया कशी आहे हे तुम्हालाही जाणून घ्यायची इच्छा असेल. सध्या सोशल मीडियावर आईसोबत टियाचे देखील चाहते कौतुक करताना दिसतात. टियाला ज्वेलरी डिझाईनिंगमध्ये करण्याची आवड असून  वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवायला तिला आवडतात.

 

याचे व्हिडीओही ती सोशल मीडियावर शेअर करत असते.या व्हिडीओंना चाहतेही भरभरुन लाईक्स आणि पसंती मिळत असते. तळवलकर ग्रुप्सचे विविध ठिकाणी फिटनेस सेंटर आहेत. याचेही कामकाज ती सांभाळते. टियाने आई आणि आजीप्रमाणे अभियक्षेत्रात एंट्री केली नसली तरी तिची आवड जपत हटके काम करत आहे. 

Web Title: Sulekha Talwalkar Daughter Look As Gorgeous As Her Mother, Know About Her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.