साध्याभोळ्या गौरीचा हेवी वर्कआऊट; अभिनेत्रीचा फिटनेस फ्रिकपणा पाहून चाहते थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2023 17:18 IST2023-04-20T17:18:20+5:302023-04-20T17:18:55+5:30
Girija prabhu: गिरीजा खऱ्या आयुष्यात तिच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देते हे या व्हिडीओवरुन लक्षात येतं.

साध्याभोळ्या गौरीचा हेवी वर्कआऊट; अभिनेत्रीचा फिटनेस फ्रिकपणा पाहून चाहते थक्क
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asata) . या मालिकेने अल्पावधीत लोकप्रिय मिळवली.उत्तम अभिनयामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. त्यातलीच एक अभिनेत्री म्हणजे गिरीजा प्रभू (girija prabhu). सध्या सोशल मीडियावर गिरीजाचा वर्कआऊट करताना व्हिडीओ व्हायरल होत आहे.
'सुख म्हणजे नक्की काय असतं' या मालिकेत गिरीजा प्रभू हिने गौरी ही मध्यवर्ती भूमिका साकारली आहे. स्वभावातील साधेपणा आणि प्रामाणिकपणा यामुळे गौरी (गिरीजा) अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यामुळेच तिच्याविषयीचे अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते कायम प्रयत्न करत असतात.
सध्या सोशल मीडियावर गिरीजाचा एक वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या ट्रेनरच्या सुचनेनुसार हेवी वर्कआऊट करत आहे. विशेष म्हणजे तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक जण तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.