'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील देवकी प्रेग्नेंट असूनही करतेय शूटिंग, फोटो होतायेत व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 13:12 IST2022-04-11T13:12:33+5:302022-04-11T13:12:56+5:30
Sukh Mhanje Nakki Kay Asta : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील देवकी अर्थात भूमिका साकारणारी मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) लवकरच आई होणार आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील देवकी प्रेग्नेंट असूनही करतेय शूटिंग, फोटो होतायेत व्हायरल
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं (Sukh Mhanje Nakki Kay Asta)मधील नवनवीन ट्विस्टमुळे मालिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळते आहे. या मालिकेतील माई, दादा, गौरी, जयदीप, शालिनी, देवकी या सर्व पात्रांनी रसिकांच्या मनात घर केले आहे. सध्या या मालिकेतील एक अभिनेत्री खूप चर्चेत आली आहे. त्याला कारणही तसे खास आहे. ही अभिनेत्री प्रेग्नेंट असूनही सध्या मालिकेचे शूटिंग करताना दिसते आहे. ही अभिनेत्री म्हणजे मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी मिनाक्षी राठोड (Meenakshi Rathod).
हो. हे खरंय. देवकी म्हणजे मिनाक्षी राठोड प्रेग्नेंट असूनही सध्या मालिकेचं शूटिंग करत आहे. त्यामुळे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. नुकतेच मिनाक्षीने इंस्टाग्रामवर सेटवर बेबी बंप फ्लॉन्ट करतानाचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करून तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, वर्किंग मॉम. मीनाक्षीचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
२०१८ साली ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतून मीनाक्षीने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. २०२० मध्ये तिला ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका मिळाली. तिने अनेक लघुपटांमध्ये काम केले आहे. तिच्या ‘खिसा’ लघुपट गाजल. या लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. मयत, कमरबंद, सायकल यासारख्या चित्रपटांमध्येही ती झळकली आहे.