'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेता कपिल होनराव दिसणार या मालिकेत, साकारणार निगेटिव्ह भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2024 18:11 IST2024-01-27T18:10:38+5:302024-01-27T18:11:10+5:30
Kapil Honrao : 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत मल्हारच्या भूमिकेत झळकलेला अभिनेता कपिल होनराव लवकरच नव्या मालिकेत काम करताना दिसणार आहे.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' फेम अभिनेता कपिल होनराव दिसणार या मालिकेत, साकारणार निगेटिव्ह भूमिका
अभिनेता कपिल होनराव (Kapil Honrao) मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. तो सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत काम करताना दिसला होता. या मालिकेत त्याने मल्हारची भूमिका साकारली होती. मालिकेत लीप आल्यामुळे त्याला या मालिकेतून निरोप घ्यावा लागला. त्याने मालिकेतून निरोप घेतला असला तरी तो सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान, आता त्याने त्याच्या नव्या मालिकेबद्दल सांगितले.
कपिल होनरावने त्याच्या नव्या मालिकेतील लूक शेअर करत लिहिले की, परत आलोय तुमचं मनोरंजन करण्यासाठी. १७ नोव्हेंबरला मल्हार म्हणून तुमचा निरोप घेतल्यानंतर. पुढे काय? हा प्रश्न होताच. आता आपण मुख्य भूमिका करावी हीच मनात, इच्छा ठेवून तशी तयारी करत होतो. वर्कआउट, डायट, मराठी डिक्शन आणि स्वतःवर काम करत होतो.
त्याने पुढे लिहिले की, तसे एक दोन जागी मुख्य भूमिकेसाठी फायनल झालो ही होतो, पण काही कारणास्तव ते फायनल नाही होऊ शकले.असो एक ना दिवस लीड नक्की करेनच आणी सुख मधून निरोप घेतल्यानंतर, तसेच रोल ऑफर होत होते. जवळपास चार-पाच भूमिकेला नाही, म्हटल्यावर हा रोल ऑफर झाला. एक निगेटिव्ह भूमिका मी कधीच केली नव्हती. म्हणून ह्या भूमिकेला मी लगेच हो म्हणालो. मल्हारला प्रेम दिलेत तसेच या भूमिकेला पण द्या. तुमच प्रेम असंच सोबत असू द्या आणि बघत रहा निवेदिता माझी ताई. सोमवार ते शुक्रवार ९ वाजता सोनी मराठीवर.