'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील या प्रसिद्ध कलाकाराचा पार पडला साखरपुडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 17:32 IST2021-11-10T17:32:09+5:302021-11-10T17:32:32+5:30
सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील कलाकाराने सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत.

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील या प्रसिद्ध कलाकाराचा पार पडला साखरपुडा
स्टार प्रवाहवरील सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. दरम्यान आता सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील अभिनेत्याचा नुकताच साखरपुडा झाला आहे. या मालिकेत उदयची भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजेच संजय पाटीलचा नुकताच साखरपुडा झाला आहे. त्याने त्याच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
अभिनेता संजय पाटील आणि अबोलीचा साखरपुडा ५ नोव्हेंबर २०२१ रोजी पार पडला आहे. दिवाळीत पाडव्याच्या मुहूर्तावर त्याचा हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे फोटो शेअर करताना तो म्हणतो “माझे आयुष्य सुंदर करणारी परी आहेस तू, मनापासून तुझ्यावर जीव लावणाऱ्या या हृदयाची राणी आहेस तू, आजपासून मी कधीही एकटा चालणार नाही”. अबोली गोखले हिला लिखाणाची विशेष आवड आहे. अबोली गोखले ही एक वेलनेस ब्लॉगर असून त्यात ती योगाचे महत्व आणि त्यापासून मेंदू आणि शरीराला शांत ठेवायचे फायदे तसेच पोषणतज्ञ त्यांची पाहायला मिळते.
अभिनेता संजय पाटीलने सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेव्यतिरिक्त सुकन्या, जय मल्हार, महाराष्ट्र जागते रहो या मालिकेत काम केले आहे. मालिका करण्यापूर्वी त्याने अनेक नाटकांत देखील अभिनय केला आहे. कमिंग सून, मुख्यमंत्री, लेडीज बार, रानजाई अशी त्याची काही गाजलेली नाटके आहेत.