'सुख म्हणजे...' फेम अभिनेत्रीची 'लक्ष्मी निवास' मालिकेत एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 11:49 IST2024-10-28T11:49:13+5:302024-10-28T11:49:55+5:30

'लक्ष्मी निवास' मालिकेत आता 'सुख म्हणजे नक्की काय असतं फेम' अभिनेत्रीचीही वर्णी लागली आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये तिची झलक दिसली आहे. 

sukh mhanje nakki kay asat fame actress meenakshi rathod to play important role in zee marathi laxmi nivas serial | 'सुख म्हणजे...' फेम अभिनेत्रीची 'लक्ष्मी निवास' मालिकेत एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

'सुख म्हणजे...' फेम अभिनेत्रीची 'लक्ष्मी निवास' मालिकेत एन्ट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

झी मराठी वाहिनीवर सध्या नव्या मालिकांची मेजवानी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सावळ्याची जणू सावली या मालिकेनंतर 'लक्ष्मी निवास' ही नवी कोरी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. हक्काच्या मोठ्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या एका मध्यमवर्गीय जोडप्याची गोष्ट या मालिकेतून दाखविण्यात येणार आहे. 

'लक्ष्मी निवास' मालिकेत हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी प्रमुख भूमिकेत आहेत. या मालिकेत ते लक्ष्मी आणि श्रीनिवास या भूमिका साकारताना दिसणार आहेत.  'लक्ष्मी निवास' मालिकेतून पाठक बाई म्हणजेच अभिनेत्री अक्षया देवधर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत आता 'सुख म्हणजे नक्की काय असतं फेम' अभिनेत्रीचीही वर्णी लागली आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये तिची झलक दिसली आहे. 


सुख म्हणजे नक्की काय असतं ही लोकप्रिय मालिका प्रचंड गाजली. या मालिकेत अभिनेत्री मिनाक्षी राठोड हिने देवकी ही भूमिका साकारली होती. या मालिकेने मिनाक्षीला लोकप्रियता मिळवून दिली. मिनाक्षी आता 'लक्ष्मी निवास' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. या मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

'लक्ष्मी निवास' ही मालिका एका कन्नड मालिकेचा रिमेक आहे. 'लक्ष्मी निवासा' या झी कन्नडवरील मालिकेसारखी झी मराठीवरील या मालिकेची कथा आहे. झी कन्नडची ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतही अव्वल होती. लवकरत 'लक्ष्मी निवास' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: sukh mhanje nakki kay asat fame actress meenakshi rathod to play important role in zee marathi laxmi nivas serial