सुकन्या मोने आणि मंदार जाधव झळकणार नव्या मालिकेत, प्रोमो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 10:32 IST2025-04-02T10:32:11+5:302025-04-02T10:32:43+5:30

Sukanya Mone And Mandar Jadhav : अभिनेत्री सुकन्या मोने आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून जयदीप म्हणून घराघरात पोहचलेला अभिनेता मंदार जाधव लवकरच एकत्र नवीन मालिकेत झळकणार आहेत.

Sukanya Mone and Mandar Jadhav will be seen in a new series, promo revealed | सुकन्या मोने आणि मंदार जाधव झळकणार नव्या मालिकेत, प्रोमो आला समोर

सुकन्या मोने आणि मंदार जाधव झळकणार नव्या मालिकेत, प्रोमो आला समोर

मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या मोने (Sukanya Mone) आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतून जयदीप म्हणून घराघरात पोहचलेला अभिनेता मंदार जाधव (Mandar Jadhav) लवकरच एकत्र नवीन मालिकेत झळकणार आहेत. या मालिकेचं नाव आहे कोण होतीस तू, काय झालीस तू!. नुकताच या मालिकेचा प्रोमो समोर आला आहे. या मालिकेत गिरीजा प्रभू आणि वैभव मांगलेदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये सुकन्या मोने यशला म्हणजेच मंदार जाधवला आवाज देताना दिसत आहे. तर दुसरीकडे यश चिकूच्या घरी येण्याच्या स्वागताची तयारी करताना दिसतो आहे. त्याला घरातील लहान मुलंदेखील मदत करत आहे. या प्रोमोत साक्षी गांधी आणि नंदिनी वैद्य देखील दिसत आहेत. काय चाललंय हे सगळे, असे मोने म्हणतात. त्यावर यश म्हणतो, आपल्या चिकूच्या स्वागताची तयारी. त्यावर सुकन्या म्हणतात, तू त्याचा बाबा असल्यासारखे वागू नकोस. एवढे स्वागत करायची काय गरज आहे, असं सुकन्या मोने यशला बोलतात. पण चिकू गोड आहे, असं तो म्हणतो. त्यावर सुकन्या म्हणतात की,  अच्छा म्हणजे तू भेटला आहेस त्यांना. तो म्हणतो नाही, दादा वहिनीच्या व्हिडीओ कॉलवर. थँक्यू आई तू दादा वहिनींना घरी येण्याची परवानगी दिली. त्यावर सुकन्या मोने म्हणतात, फक्त परवानगी दिलीय माफ केलेलं नाही. त्यावर यश म्हणतो माझी खात्री आहे की नातवाला बघून तू बदलशील. त्यानंतर यश म्हणतो की मी दादा वहिनीला परत आणणार हे घर पुन्हा एकत्र जोडणार.  


कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका २८ एप्रिलपासून दररोज रात्री ८ वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पाहायला मिळेल. या मालिकेत गिरीजा कावेरीच्या भूमिकेत दिसणार आहे. ती कोकणात राहणारी असून ती मालवणी भाषा बोलताना दिसणार आहे. तिच्या वडिलांच्या भूमिकेत वैभव मांगले पाहायला मिळणार आहे. या मालिकेतून पुन्हा एकदा मंदार जाधव आणि गिरीजा प्रभू एकत्र काम करताना दिसणार आहेत. त्यांना पुन्हा एकत्र मालिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Sukanya Mone and Mandar Jadhav will be seen in a new series, promo revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.