सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 11:07 IST2025-12-03T11:06:52+5:302025-12-03T11:07:11+5:30
लग्न झाल्यावर सोहम-पूजा यांचा सूनमुख विधी पार पडला. सुचित्रा बांदेकर यांनी आरशात सून आणि लेकाचा चेहरा पाहिला.

सूनमुख विधी! सुचित्रा बांदेकरांनी आरशात पाहिला सूनेचा चेहरा, सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण
मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांच्या लेकाचा लग्नसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. सोहमने अभिनेत्री पूजा बिरारीशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्या लग्नाची चर्चा होती. शिवाय चाहतेही सोहम-पूजाच्या लग्नाची वाट पाहत होते.
लग्न झाल्यावर सोहम-पूजा यांचा सूनमुख विधी पार पडला. सुचित्रा बांदेकर यांनी आरशात सून आणि लेकाचा चेहरा पाहिला. सोहम-पूजाच्या लग्नातील खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सोहम आणि पूजा सुचित्रा बांदेकर यांच्या बाजूला बसले आहेत. समोर आरशात तिघेही एकमेकांना पाहत असल्याचं दिसत आहे. या गोड क्षणाने उपस्थितीतांचंही लक्ष वेधून घेतलं होतं.

पूजा आणि सोहमच्या लग्नाला मराठी कलाविश्वातील कलाकारांनीही हजेरी लावली होती. पूजाने लग्नासाठी गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तर गुलाबी रंगाच्या शेरवानीमध्ये सोहम राजबिंडा दिसत होता. वरमाय असलेल्या सुचित्रा बांदेकरही खास नटल्या होत्या. बांदेकरांची सून होत पूजाने तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.