यश कधीही डोक्यात जाऊ देता कामा नये-शान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 16:08 IST2017-11-10T10:38:57+5:302017-11-10T16:08:57+5:30

छोट्या पडद्यावर कोणता कार्यक्रम सुपरहिट ठरला तर त्याचा दुसरा सिझन रसिकांच्या भेटीला येणार हे समीकरण तर आता जवळपास इंडस्ट्रीत ...

Success should never be in the head! | यश कधीही डोक्यात जाऊ देता कामा नये-शान

यश कधीही डोक्यात जाऊ देता कामा नये-शान

ट्या पडद्यावर कोणता कार्यक्रम सुपरहिट ठरला तर त्याचा दुसरा सिझन रसिकांच्या भेटीला येणार हे समीकरण तर आता जवळपास इंडस्ट्रीत रूढ होत आहे.आता अनेक रिअॅलिटी शो छोट्या पडद्यावर एंट्री केली आहे.त्याच यादीत व्हॉईस ऑफ इंडिया किडस् हे सिझनचा आवर्जु उल्लेख करावा लागेल. शान पुन्हा एकदा या शोला जज करतोय या शोविषयी त्याचे मत जाणून घेतले आहे.

तर,व्हॉइसच्या आगामी सीझनबद्दल तुझे मत काय आहे ?
व्हॉइसबद्दल बोलायचं तर इथे बहुतेक गोष्टी ठरलेल्या आहेत. मी नेहमीच चांगल्या, सुरेल आवाजाचा शोध घेतो. अखेर, प्रेक्षकांनी गाणं ऐकावं आणि म्हणावं, “वा.. काय आवाज आहे आणि केवढी सुधारणा झालीय. आपण कोणत्या ना कोणत्या मार्गाने योगदान देऊ शकलो याचं समाधान मला तेव्हाच मिळेल. मला त्यांच्यासोबत कष्ट घेतले पाहिजेत,त्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि अर्थातच यशाच्या या प्रवासात त्यांच्यासोबत वेळ घालवला पाहिजे.

तुमच्या टीममध्ये १५ मुलं आहेत. मग एक मेण्टर म्हणून तुम्ही त्यांना काय सांगाल?
व्हॉइसमध्ये प्रत्येक जजच्या टीममध्ये १५ मुलं आहेत. या मुलांपैकी कोणालाही असं वाटता कामा नये की मी एखाद्या मुलाला झुकतं माप देतोय किंवा एखाद्याला बाकीच्यांच्या तुलनेत जास्त वेळ देतोय. हा समतोल साधणं थोडं कसरतीचं आहे. मला प्रत्येकाला सारखा वेळ द्यायचा आहे, त्यांच्यापैकी कोणीही जिंकेल आणि मला तर वाटतं प्रत्येकानेच जिंकावं.

तुम्ही स्वत: एवढे यशस्वी असूनही खूप नम्र आहात. कायम नम्र राहावं, जमिनीवर राहावं यासाठी स्पर्धकांना काही टिप्स तुम्ही देता का? 
माझा आतापर्यंतचा जो काही अनुभव आहे, त्यावरून माझ्या एक लक्षात आलंय की यश नेहमी टप्प्याटप्प्यात मिळतं. आज मला खूप यश मिळेल, कदाचित उद्या ते मिळणार नाही. एक माणूस म्हणून, हे यश कधीही डोक्यात जाऊ देता कामा नये. लोकांच्या तुमच्याबद्दल काही धारणा असतात. तुम्ही कायम जमिनीवर राहणं महत्त्वाचं असते. “तो खूप चांगला अभिनेता आहे पण त्याला भेटलो तेव्हा तो खूपच शिष्ट वाटला!” असं कोणी तुमच्याबद्दल म्हणालं तर काय अर्थ उरला? मी मुलांना हेच सांगतो. तुम्ही जे नाही आहात,ते असण्याचं ढोंग करू नका. काहीवेळा मुलं ती जे नाही आहेत, त्याचं सोंग आणण्याचा प्रयत्न करतात. माझा त्यांना सल्ला आहे की, नेहमी शक्य तेवढं नैसर्गिक आणि खरं वागण्याचा प्रयत्न करा.

या शोमध्ये तुम्ही गेले दोन सीझन्स कोच आहात- मोठ्यांचे आणि मुलांचे. तेव्हा या सीझनमध्ये प्रेक्षकांना वेगळं असं काय बघायला मिळेल? 
प्रामाणिकपणे सांगायचं तर, या सीझनमध्ये काय नवीन आहे हे इतक्या सुरुवातीच्या टप्प्यावर सांगता येणं कठीण आहे. शोमध्ये काय काय नवीन उलगडतंय हे बघण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल. अर्थातच प्रतिभा हा फरकाचा मुख्य मुद्दा आहे. सगळ्या टीम्समध्ये चांगला समतोल आहे. खरं तर प्रत्येक टीममध्ये सहा-सात आवाज असे आहेत, जे केवळ शोलाच नव्हे, तर इंडस्ट्रीला हलवून सोडतील.

टेलीव्हिजन शोमध्ये छोटी मुलं असतील, तर सर्वांचं त्यांच्यासोबत भावनिक नातं जडतं. या शोपासून दूर जाता तेव्हा तुमच्यावर त्याचा परिणाम होतो?

मी मुलांशी संपर्क ठेवण्याचा प्रयत्न आवर्जून करतो. ही सगळी मुलं माझ्या वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुप्समध्ये आहेत.

तुमच्या मुलांना टीव्ही बघायला आवडतं? तुमची मुलं तुमचे किंवा यातल्या स्पर्धकांचे चाहते आहेत का?
मोठ्याला वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आवडतात. धाकटा मात्र केवळ हिंदी बघतो. ते दोघंही हा शो बघतात. मी स्क्रीनवर काहीतरी वेड्यासारखं करतो, तेव्हा ते टोमणेही मारतात.“तुम्हाला घरी एक फॅमिली आहे हे विसरू नका प्लीज वगैरे. मात्र,सुदैवाने मुलं खूप समजुतदार आहेत. मला आशा वाटते की लवकरच त्यांची गायनातली प्रतिभा तुमच्यासमोर येईल.

तुमच्या नवीन गाण्याबाबत- सुरिलीबाबत जाणून घ्यायला आवडेल?
लोकांना हे गाणं आवडतंय. यूट्यूबवर आतापर्यंत या गाण्याला खूप लोकप्रियता मिळालीये. गाण्याचे शब्द अप्रतिम आहेत, सेल्फी मैंने ले लिया टाइपचे नाहीत. या गाण्याला नक्कीच काहीतरी अर्थ आहे. तुम्ही बघितलं नसेल आत्तापर्यंत, तर जा, बघा लगेच!

Web Title: Success should never be in the head!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.