'तू भेटशी नव्याने' मालिकेसाठी सुबोध भावेने घेतली कॉलेजमधील प्रोफेसरची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 12:36 PM2024-05-25T12:36:24+5:302024-05-25T12:37:40+5:30

Subodh Bhave : सुबोध भावे लवकरच 'तू भेटशी नव्याने' मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची नवी कोरी जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

Subodh Bhave visited the professor in the college for the series 'Tu Bhetshi Navyane' | 'तू भेटशी नव्याने' मालिकेसाठी सुबोध भावेने घेतली कॉलेजमधील प्रोफेसरची भेट

'तू भेटशी नव्याने' मालिकेसाठी सुबोध भावेने घेतली कॉलेजमधील प्रोफेसरची भेट

सुबोध भावे (Subodh Bhave) लवकरच 'तू भेटशी नव्याने' (Tu Bhetashi Navyane) मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सुबोध भावे आणि शिवानी सोनार यांची नवी कोरी जोडी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘तू भेटशी नव्याने’ मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. सुबोध भावे यांनी मालिकेमध्ये पुनरागमन केले आहे. 

 'तू भेटशी नव्याने' मालिकेच्या प्रोमोने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. सुबोध भावे या मालिकेत दुहेरी भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. एका भूमिकेत कॉलेजमध्ये शिक्षक म्हणून आदरयुक्त भीती असणारा अभिमन्यू सर आणि दुसरी भूमिका म्हणजे सर्वांचा लाडका माही. AI च्या मदतीने सुबोध चक्क ऐन वीस वर्षांचा माही दिसणार आहे. आता अशा विशिष्ट भूमिकेची तयारी करायची म्हणजे नवी सुरुवात हवीच. अभिमन्यू सर या व्यक्तिरेखेची विशेष तयारी करण्याची सुरुवात सुबोधने केली आहे.

 सुबोधने चक्क आपल्या कॉलेजमधल्या आवडत्या शिक्षकांना गाठले. शिरिश लिमये असे या शिक्षकांचे नाव आहे. सुबोध च्या कॉलेज मधील हे प्रोफेसर असून त्यांच्याशी बोलताना कॉलेज प्रोफेसर ही व्यक्तिरेखा कशी असेल याबद्दल गप्पा रंगल्या. सुबोधने अभिमन्यू सर या व्यक्तिरेखेला साकारण्यापूर्वी आपल्या आवडत्या शिक्षकांच्या शुभेच्छासुद्धा घेतल्या. प्रोफेसरच्या व्यक्तिरेखेत कसे वावरावे, ही व्यक्तिरेखा कशा प्रकारे रंगतदार करता येईल याविषयी त्यांच्या गप्पा रंगल्या. कॉलेजमध्ये असताना सुबोध किती खोडकर होता आणि किती अभ्यास करायचा हेसुद्ध या गप्पांमधून उलगडले आहे. विद्यार्थी ते शिक्षक हा सुबोधचा  प्रवास त्याच्या शिक्षकांनी पाहिला आहे. त्यांचाच आशीर्वाद घेत सुबोधने ही व्यक्तिरेखा साकारण्याच्या तयारीला सुरुवात केली असंही म्हणता येईल. 

Web Title: Subodh Bhave visited the professor in the college for the series 'Tu Bhetshi Navyane'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.