ढोलकीच्या मंचावर स्टंटबाज लावणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2017 15:30 IST2017-06-27T10:00:04+5:302017-06-27T15:30:15+5:30

ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमामध्ये स्पर्धक आपल्या लावणी परफॉर्मन्सच्या माध्यमातून नेहमीच काहीतरी वेगळेपण देण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत या मोठ्या आणि ...

Stunt bowl on the drumming stage! | ढोलकीच्या मंचावर स्टंटबाज लावणी!

ढोलकीच्या मंचावर स्टंटबाज लावणी!

लकीच्या तालावर या कार्यक्रमामध्ये स्पर्धक आपल्या लावणी परफॉर्मन्सच्या माध्यमातून नेहमीच काहीतरी वेगळेपण देण्याचा प्रयत्न करतात. आतापर्यंत या मोठ्या आणि छोट्या अप्सरांनी मिळून ठसकेबाज लावणीचे चॅलेंज उत्तमरीत्या पेलले आहे. पण या आठवड्यात मात्र छोट्या अप्सरांपुढे खरोखरच मोठे आव्हान होते.पहिल्यांदाच ढोलकीच्या मंचावर लावण्यांमध्ये स्टंटचा वापर करण्याचे आव्हान देण्यात आले होते. हा स्टंट राउंडमध्ये या चिमुकल्या इतक्या सहजरीत्या आणि आत्मविश्वासाने हे आव्हान पेलत असल्याचे पाहून प्रेक्षक आणि परीक्षक यांना देखील कौतुक वाटत होते. 



स्टंट राऊंड भागाची सुरुवात देखील विशेष पद्धतीने झाली असे म्हणायला हरकत नाही. हेमंत ढोमे ने भागाच्या सुरुवातीला या थीमला साजेशी अशी एन्ट्री केली. तो हार्नेस लावून आभाळातून मंचावर अवतरला. अंकिता आणि आर्याने मंकी बार्सचा उपयोग करून हि पोळी साजूक तुपातली या गाण्यावर लावणी सादर केली तसेच एरियल इलास्टिक वापरून स्नेहल आणि तनयाने उत्तम लावणी सादर करून परीक्षकांची शाबासकी मिळवली.धनश्री आणि अनुष्काने ट्रॅक ट्रॉलीचावापर करून नृत्य सादर केले. ट्रॅक ट्रॉलीचा वापर करून नृत्य करणे खूप अवघड आहे, त्यावर तोल सांभाळून, चेहऱ्यावरील हावभाव न बदलता आपल्या जोडीदाराबरोबर नृत्य करण्याचे आव्हान त्यांनी अगदी सहज पार केले.



विशेष म्हणजे समृद्धी आणि धनिष्ठाने बर्फाच्या लादीवर नृत्य करण्याचे आव्हान अगदी सहजरीत्या पेलले. त्यांनी राजसा जवळी जरा बसा या गाण्यावर लावणी सादर केली. बर्फाच्या लादीवर उभे राहणे हे किती कठीण असते याची कल्पना आपण करू शकतो कारण बर्फ हातामध्ये पकडायचा म्हंटल तरी ते खूप कठीण असते, पण या मुलींनी तब्बल ३ मिनिटे सलग त्या बर्फाच्या लादीचा वापर करून नृत्य केले हे खरचं कौतुकास्पद आहे. ही लावणी बघितल्यानंतर जितेंद्र जोशीला देखील बर्फाच्या लादीवर उभे रहाण्याचा अनुभव घ्यावासा वाटला. त्याने समृद्धी आणि धनिष्ठाच्या हिंमतिची दाद दिली.

Web Title: Stunt bowl on the drumming stage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.