​जय मल्हारमध्ये ही गोष्ट उलगडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 15:23 IST2017-01-06T15:23:33+5:302017-01-06T15:23:33+5:30

जय मल्हार ही मालिका गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेमुळे देवदत्त नागे, इशा केसकर, सुरभी हांडे ...

This story will be revealed in Jai Malhar | ​जय मल्हारमध्ये ही गोष्ट उलगडणार

​जय मल्हारमध्ये ही गोष्ट उलगडणार

मल्हार ही मालिका गेल्या कित्येक दिवसांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेमुळे देवदत्त नागे, इशा केसकर, सुरभी हांडे यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली आहे. या मालिकेत म्हाळसेला मूळ रुपाची जाणीव कधी होणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागलेली आहे. हीच गोष्ट प्रेक्षकांना लवकरच जय मल्हार या मालिकेत पाहायला मिळणार आहे. 
म्हाळसा आणि बानू यांमध्ये ज्यांना आपले मूळ रूप आधी कळेल त्यांच्यासोबत खंडेराय कैलासाला जाणार आहेत. त्यामुळे मूळ रूप जाणून घेण्याची चुरस म्हाळसा आणि बानू यांमध्ये लागली आहे. या दोघांमध्ये आता म्हाळसाला तिच्या मूळ रूपाची जाणीव होणार आहे. पण त्यानंतर काय घडते हे पाहाणे रंजक ठरणार आहे.  या मालिकेचा एक विशेष भाग प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळणार असून त्यात प्रेक्षकांना ही गोष्ट जाणून घेता येणार आहे. 
तसेच जिथे शिव असतो तिथे शक्तीच्या रूपात पार्वती ही असतेच असे म्हटले जाते. मणी आणि मल्ल दैत्यांचा संहार करताना शिवाला म्हणजेच खंडेरायाला या शक्तीची अदृश्य स्वरूपातील सोबत होतीच. पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार झालेल्या खंडोबांच्या सोबतीला तीक्ष्ण भाला घेतलेली म्हाळसा देवी आहे आणि पुढे आपला लाडका श्वान वाघ्या, यांनी मिळून मणी आणि मल्लाचा वध केला असा हा प्रसंग सर्वश्रुत आहे. हाच प्रसंग चितारणारी एक प्रतिमा घरोघरी पुजली जाते. अनेक ठिकाणी ती चांदीच्या पत्र्यात किंवा तांब्याच्या पत्र्यातही कोरलेली बघायला मिळते. धातूंमध्ये कोरलेली ही प्रतिमा खंडोबाचा टाक म्हणून ओळखली जाते. ही प्रतिमा निरखून बघितल्यास एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे यात म्हाळसा खंडेरायाच्या मागे किंवा पुढे बसलेली नसून ती त्यांच्या सोबतीने घोड्यावर स्वार झालेली आहे. त्यांच्या बरोबरीने ती या दैत्यांशी लढते आहे. याचाच अर्थ ती शक्तीरूपाने खंडेरायाच्या सोबत आहे. त्यामुळेच या प्रतिमेचं एक विशेष महत्त्व आहे. आजवर प्रतिमेच्या रूपात असलेली ही गोष्ट पहिल्यांदाच एका भव्य दिव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार आहे. आजवर टाकामध्ये कोरलेल्या या प्रतिमेला पहिल्यांदाच चेहरा मिळणार आहे.

Web Title: This story will be revealed in Jai Malhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.