Anita Date-Kelkar: जो आवडतो सर्वांना... अनिता दातेच्या सोशल मीडियावरील त्या फोटोमुळे खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 08:11 IST2022-07-07T08:10:57+5:302022-07-07T08:11:39+5:30

Anita Date-Kelkar: माझ्या नवऱ्याची बायको या सुपरहीट मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते-केळकर हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या फोटोमुळे खळबळ उडाली आहे.

stir because of that photo of Anita Date on social media | Anita Date-Kelkar: जो आवडतो सर्वांना... अनिता दातेच्या सोशल मीडियावरील त्या फोटोमुळे खळबळ 

Anita Date-Kelkar: जो आवडतो सर्वांना... अनिता दातेच्या सोशल मीडियावरील त्या फोटोमुळे खळबळ 

मुंबई -  माझ्या नवऱ्याची बायको या सुपरहीट मालिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री अनिता दाते-केळकर हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या फोटोमुळे खळबळ उडाली आहे. या फोटोमध्ये अनिता दातेची तसबीर दिसत असून, तिला हार घातलेला आहे. त्या फोटोवर जो आवडतो सर्वांना... अशी कॅप्शन दिलेली आहे. त्यामुळे हा फोटो पाहून बघणाऱ्यांना प्रथमदर्शनी अनेकांना धक्का बसत आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे स्वत: अनिता दाते हिनेच तिच्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर हा फोटो शेअर केला आहे. तसेच त्या फोटोला जो आवडतो सर्वांना अशी कॅप्शन दिली आहे. मात्र अनिता दाते हिने स्वत:च असा फोटो का शेअर केला, असा प्रश्न मनोरंजन जगत आणि तिच्या चाहत्यांना पडला आहे.

या फोटोमागे कुठल्या नवीन प्रोजेक्टचे प्रमोशन आहे की आणखी काही अशी चर्चाही रंगली आहे. अनिता दातेची माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. तर मी वसंतराव या चित्रपटामध्येही ती महत्त्वाच्या भूमिकेत ती दिसली होती. 

Web Title: stir because of that photo of Anita Date on social media