झी रिश्ते अॅवॉर्डला स्टारची मांदियाळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2017 13:16 IST2017-02-07T07:46:10+5:302017-02-07T13:16:10+5:30
झी रिश्ते अॅवॉर्ड हा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्याला विविध तारकांनी हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्याचे ...

झी रिश्ते अॅवॉर्डला स्टारची मांदियाळी
झ रिश्ते अॅवॉर्ड हा पुरस्कार सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्याला विविध तारकांनी हजेरी लावली. या पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन रित्विक धनजानी आणि स्टँडअप कॉमेडियन भारती सिंग यांनी केले. त्यांनी आपल्या अचूक विनोदी टायमिंगने प्रेक्षकांना लोटपोट हसवले. पुरस्कार सोहळ्याच्या सुरुवातीच्या अॅक्टमध्ये संपूर्ण झी परिवाराची ओळख करून देण्यात आली. या सोहळ्यातील नृत्यांमध्ये निरनिराळे प्रॉप्स, एरिअल प्रवेश आणि नजरेला भावतील अशा स्पेशल इफेक्टसचा वापर करण्यात आला होता.
![Isha Singh]()
शब्बीर आहुवालिया आणि श्रृती झा यांनी तेरे संग यारा आणि टूटा जो कोई तारा, लग जा गले या गाण्यांवर नृत्य सादर केले तर समीक्षा जैस्वाल, क्रिस्टल आणि शायनी दोशी यांनी पिंगा, सौ तरह के आणि हम्मा यांसारख्या गाण्यांवर परफॉर्मन्स सादर करून उपस्थितांचे मनोरंजन केले. रवी दुबे, इक्बाल खान, सुदीप साहिर आणि करण वोहरा या झीच्या नायकांनी विविध गाण्यांवर डान्स सादर करत उपस्थितांचे मन जिंकले. या पुरस्कार सोहळ्यात फेव्हरेट सासू, आजोबा, घरवाली, बाहरवाली, वडील, मुलांनी सादर केलेल्या परफॉर्मन्सने तर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
![Ravi Dubey]()
सारेगमपाचा सूत्रसंचालक आदित्य नारायण आणि मास्टर मुदस्सर यांची गायन विरुद्ध नृत्य ही जुगलबंदी तर खूपच रंगली होती. कॉमेडी कंग कृष्णा आणि मुबीन या सोहळ्यात गॉसिपप्रेमी आंटीच्या रूपात अवतरले होते. त्यांनी त्यांच्या या अॅक्टने प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर आणखी एका अॅक्टमध्ये कृष्णा, मुबीन आणि श्रेया हे फिक्शन लेखक, निर्माते आणि वाहिनी प्रमुख बनले होते. त्यांनी टिव्ही शो निर्माण करण्याबद्दलचे विडंबन सादर केले. तसेच डान्स इंडिया डान्सच्या स्पर्धकांनी अनेक दमदार परफॉर्मन्स सादर केले. या पुरस्कार सोहळ्याला अनिता हंसनंदानी, इशा सिंग, अहम शर्मा, आशा नेगी, दिव्यांका त्रिपाठी, विवेक दहिया यांसारखे अनेक सेलिब्रेटीज उपस्थित होते.
![Karan Vohra]()
![Aham Sharma]()
![Asha negi]()
![Divyanka Tripathi and Vivek Dhaiya]()