एवढी फालतुगिरी...?  ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील नवा ड्रामा पाहून भडकले युजर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2022 06:32 PM2022-03-04T18:32:48+5:302022-03-04T18:33:30+5:30

Sukh Mhanje Nakki Kay Asta : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतही असाच एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळतोय. मालिकेत गौरी सारखी दिसणारी एक स्त्री शिर्केपाटील कुटुंबात आली आहे. पण गौरीचा हा बदलेला अंदाज नेटकऱ्यांच्या मात्र पचनी पडलेला नाही.

star pravah sukh mhanje nakki kay asta marathi serial gets trolled | एवढी फालतुगिरी...?  ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील नवा ड्रामा पाहून भडकले युजर्स

एवढी फालतुगिरी...?  ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’मधील नवा ड्रामा पाहून भडकले युजर्स

googlenewsNext

Sukh Mhanje Nakki Kay Asta : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’  ही प्रेक्षकांची आवडती मालिका. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी मालिकेत नवनवे ट्वीस्ट आणले जातात. ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतही असाच एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळतोय. होय, जयदीपने गौरीला कड्यावरून ढकलून दिलं. त्यानंतर गौरीचा मृत्यू झाला, असं वाटत असताना आता मालिकेत गौरी सारखी दिसणारी एक स्त्री शिर्केपाटील कुटुंबात आली आहे. गौरीसारखी दिसत असली तरी तिचा अवतार, अंदाज असा सगळाच कारभार निराळा आहे. मालिकेतील ही नवी एन्ट्री काहींना आवडली आहे. पण अनेकांनी मात्र हा सगळा ट्वीस्ट म्हणजे, चांगल्या मालिकेचं  मातेरं करण्यासारखं असल्याच्या  प्रतिक्रिया दिल्या आहेत.

होय, ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील नवा ट्वीस्ट, गौरीचा नवा लुक (Gauris new look ) पाहून नेटकऱ्यांनी या मालिकेला ट्रोल करायला सुरूवात केली आहे. याच्या प्रोमोवर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
‘एवढी फालतुगिरी एका कुटुंबात होऊ शकते का?’ असा सवाल एका नेटकऱ्याने केला आहे. त्या गौरीचे अजून किती लूक चेंज करणार? असा सवाल अन्य एका युजरने केला आहे. काय फालतुगिरी आहे, असे कसे मालिकेतील पात्र बदलतात? असा सवाल एका युजरने केला आहे. एका युजरने तर यापुढे जात, ‘लाज वाटत नाही का... काहीही दाखवायला’, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

‘ आम्ही गेली अनेक दिवस ही मालिका पाहात आहोत. या मालिकेची कथा आता थोडी खराब वळणावर जाताना दिसत आहे. यामुळे अनेक प्रेक्षकांचा या मालिकेवरून इंट्रेस जात आहे,’ अशा थेट शब्दांत एका चाहत्याने आपली नाराजी बोलून दाखवली आहे.

‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेतील गौरी आई होऊ शकणार नाही, असा ट्रॅक मागच्या काही दिवसांत मालिकेत सुरू होता. यानंतर जयदीप व गौरी सरोगसीची मदत घेण्याचा निर्णय घेतात. मानसीही यासाठी पुढाकार घेते. मात्र यादरम्यान गौरीला मानसीचा खरा डाव कळतो. ती जयदीपला सर्व सांगण्याचा प्रयत्न करते. पण जयदीप ऐनवेळी तिला दगा देत, तिला कड्यावरून ढकलून देतो.

Web Title: star pravah sukh mhanje nakki kay asta marathi serial gets trolled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.