'मन धागा धागा जोडते नवा' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2024 11:23 IST2024-10-03T11:05:19+5:302024-10-03T11:23:15+5:30

अभिषेकने त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. अभिषेक भूमिका साकारत असलेल्या सार्थक राजाध्यक्ष या नावाच्या पाटीचा फोटो त्याने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अभिषेकने भावुक पोस्ट लिहिली आहे. 

star pravah man dhaga dhaga jodate nava marathi serial goes off air actor abhishek rahalkar shared special post | 'मन धागा धागा जोडते नवा' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

'मन धागा धागा जोडते नवा' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप? अभिनेत्याची 'ती' पोस्ट चर्चेत

छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांपैकी 'मन धागा धागा जोडते नवा' ही लोकप्रिय मालिका आहे. स्टार प्रवाहवरील या मालिकेने अल्पावधीच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या मालिकेतील सार्थक-आनंदीची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. पण, आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या मालिकेत सार्थक राजाध्यक्षची भूमिका साकारणाऱ्या अभिषेक राहाळकरने एक पोस्ट शेअर केली आहे. 

अभिषेकने त्याच्या सोशल मीडियावरुन एक पोस्ट शेअर केली आहे. अभिषेक भूमिका साकारत असलेल्या सार्थक राजाध्यक्ष या नावाच्या पाटीचा फोटो त्याने शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत अभिषेकने भावुक पोस्ट लिहिली आहे. 

"इस सफ़र की इंतिहाँ तो आ गई
अब सफ़र एक और सफ़र की ओर हो

हम-सफ़र और रहबरों का शुक्रिया
अब न मुड़ना तोड़ जो भी डोर हो

मील पत्थर है ये मंज़िल जानले
चल तू राही जब तलक की भोर हो"


अभिषेकच्या या पोस्टवरुन 'मन धागा धागा जोडते नवा' मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. ही मालिका खरंच संपणार आहे का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत. आवडती मालिका लवकर प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याने चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

सध्या 'मन धागा धागा जोडते नवा' मालिका रंजक वळणावर आहे. या मालिकेत काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री मयुरी देशमुख हिने एन्ट्री घेतली. मयुरी या मालिकेत सुखदाची भूमिका साकारत आहे. आनंदी आणि सार्थकला पुन्हा एकत्र आणण्यासाठी मयुरी प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. तसंच कल्याणीच आनंदी असल्याचं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. 

Web Title: star pravah man dhaga dhaga jodate nava marathi serial goes off air actor abhishek rahalkar shared special post