'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत आणखी एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री! कोणती भूमिका साकारणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 13:44 IST2025-03-03T13:41:44+5:302025-03-03T13:44:46+5:30
टीआरपीच्या शर्यतीमध्ये टिकून राहण्यासाठी सध्या वाहिन्यांकडून वेगवेगळे प्रयोग करण्यात येतात.

'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत आणखी एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री! कोणती भूमिका साकारणार?
Laxmichya Pavlani: टीआरपीच्या शर्यतीमध्ये टिकून राहण्यासाठी सध्या वाहिन्यांकडून वेगवेगळे प्रयोग करण्यात येतात. त्यातच छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये गेल्या काही दिवसांत बऱ्याच कलाकारांच्या एन्ट्री झाल्याचं पाहायला मिळालं. मालिकेचं कथानक आणखी रंजक करुन, प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी असे प्रयत्न केले जातात. दरम्यान, अशातच मागील काही दिवसांमध्ये स्टार प्रवाह वाहिनीवरील लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका सातत्याने चर्चेत येत आहे. त्यात आता या मालिकेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. लवकरच मालिकेमध्ये एक नवीन चेहरा पाहायला मिळणार आहे.
'लक्ष्मीच्या पावलांनी' ही मालिका टेलिव्हिजनवरील लोकप्रिय असलेल्या मालिकांपैकी एक आहे. अभिनेता अक्षर कोठारी आणि ईशा केसकर यांनी मालिकेत मुख्य भूमिका असलेली ही मालिका प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते आहे. दरम्यान, अगदी काही महिन्यांपूर्वीच या मालिकेतून अभिनेता ध्रुव दातारने एक्झिट घेतली होती. त्याच्याजागी मालिकेत अभिनेता अद्वैत कडणेची एन्ट्री झाली. त्यानंतर राहुलची ऑनस्क्रीन पत्नी म्हणजेच नैनाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा सपकाळनेही सुद्धा मालिकेतून एक्झिट घेतली. आता नैनाच्या भूमिकेत सानिका बनारसवाले पाहायला मिळतेय. त्यात आता लक्ष्मीच्या पावलांनी मध्ये एका नवीन पात्राची भर पडली आहे. मालिकेमध्ये 'फुलपाखरु' फेम अभिनेत्री तृष्णा चंद्रात्रेची एन्ट्री झाली आहे.
तृष्णा चंद्रात्रे 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेत अनामिका नावाचं पात्र साकारणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे तिच्या मालिकेत कोणतं नवं वळण येणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
वर्कफ्रंट
दरम्यान, तृष्णा चंद्रात्रे ‘फुलपाखरू’ या लोकप्रिय मालिकेत काम केलेलं आहे. अभिनेत्री हृता दुर्गुळेसोबत तिने स्क्रीन शेअर केली होती. त्याचबरोबर 'अंतरपाट',' हृदयी प्रीत जागते', या मालिकांमध्येही ती झळकली आहे. आता तृष्णा 'लक्ष्मीच्या पावलांनी' मालिकेतून प्रेक्षकांच्या मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.