'या' मराठी अभिनेत्रीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, लवकरच अडकणार लग्नबंधनात!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 10:07 IST2025-09-19T10:05:07+5:302025-09-19T10:07:48+5:30
मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

'या' मराठी अभिनेत्रीने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी, लवकरच अडकणार लग्नबंधनात!
गेल्या काही दिवसांपासून मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार लग्नगाठ बांधत आहेत. नुकताच अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचा साखरपुडा पार पडल्याची बातमी समोर आली होती. आता मराठी मालिकाविश्वातील आणखी एक लोकप्रिय अभिनेत्री लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 'कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेतील 'विद्या' ही भूमिका साकारणारी अभिनेत्री साक्षी महाजन हिचा विवाह लवकरच होणार असून, तिने स्वतः याबाबत खुलासा केलाय.
साक्षी महाजन सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील एका नव्या प्रवासाची तयारी सुरू झाली आहे. साक्षीने स्वतः एका मुलाखतीत ती लवकरच लग्न करणार असल्याची माहिती दिली आहे. 'राजश्री मराठी शोबझ'शी बोलताना साक्षी महाजनने पुढच्या वर्षी लग्न करणार असल्याची कबुली दिली. लग्नाची तयारी सुरू झाल्याचे सांगत साक्षी म्हणाली, "हो… मी पुढच्या वर्षीच लग्न करणार आहे. त्यामुळे खूप काय काय डोक्यात आहे. कोणती स्टाइल करायची? कोणतं फाउंडेशन लावायचं? कुठल्या रंगाची साडी घालायची? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत".
साक्षी महाजन ही लग्नासाठी खूप उत्सुक असल्याचं तिची सहकलाकार आणि चांगली मैत्रिण साक्षी गांधीने सांगितलं. साक्षी गांधी म्हणाली, "लग्नाचा विषय निघाला की ही खूपच उत्सुक होते. तिचं म्हणणं आहे की, माझं लग्न एकदाच होणार आहे ना… बाकी सगळ्या गोष्टी मी दहावेळा करेन, पण लग्न एकदाच होणार आहे. तिच्याकडून मला काही नवीन शब्द कळले आहेत. जसे की, वेडिंग फाउंडेशन, वेडिंग लिपस्टिक, वेडिंग व्हॅनिटी असं बरंच काही सुरू आहे".
कोण होतीस तू काय झालीस तू' या मालिकेपुर्वी साक्षी महाजन हिनं ''उदे गं अंबे'' या मालिकेत काम केलं. यामध्ये तिने राणी नीलकांतीची भूमिका तिने साकारली होती. साक्षी महाजन सोशल मीडियावर सक्रीय असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात असते.