स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सर तरीही केलं लग्न, हिना खान भावुक, पती म्हणाला- "मी तुझ्यासोबत १० वेळा लग्न करेन..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 13:23 IST2025-08-05T13:22:00+5:302025-08-05T13:23:54+5:30
हिना आणि रॉकी 'पती, पत्नी और पंगा' या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाले आहेत. या शोमध्ये हिनाने रॉकीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सर तरीही केलं लग्न, हिना खान भावुक, पती म्हणाला- "मी तुझ्यासोबत १० वेळा लग्न करेन..."
'ये रिश्ता क्या कहलाता है'मध्ये अक्षराची भूमिका साकारून अभिनेत्री हिना खानला प्रसिद्धी मिळाली. या मालिकेमुळे हिना खान घराघरात पोहोचली. अनेक मालिकांमध्ये हिनाने काम केलं आहे. हिंदी टेलिव्हिजनचा ती लोकप्रिय चेहरा आहे. पण, गेल्याच वर्षी हिनाला ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं होतं. ज्यामुळे तिचं आयुष्यच पूर्णपणे बदलून गेलं. पण, तरीही हिना थांबली नाही की तिने करिअरला ब्रेक दिला नाही. आणि या सगळ्यात बॉयफ्रेंड रॉकीची तिला उत्तम साथ लाभली.
काही महिन्यांपूर्वीच हिना आणि रॉकीने लग्नाच्या बेडीत अडकत संसार थाटला आहे. स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सर असूनही हिनाशी लग्न केल्याने रॉकीचं कौतुक होत होतं. आता हिना आणि रॉकी 'पती, पत्नी और पंगा' या रिएलिटी शोमध्ये सहभागी झाले आहेत. या शोमध्ये हिनाने रॉकीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या. रॉकीबद्दल बोलताना हिना भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. याचा व्हिडीओ कलर्सच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत रॉकी हिनाची काळजी घेताना दिसत आहे.
हिना म्हणते, "हा माझ्या खूप काही करतो. तुम्ही जेव्हा एका इमोशनल जर्नीमधून जात असता तेव्हा एका पार्टनरसाठी एका अशी मुलीसोबत लग्न करणं खूप कठीण असतं जिच्यात खूप काही दोष आहेत". त्यावर रॉकीने दिलेल्या उत्तराने सगळ्यांची मनं जिंकली. रॉकी म्हणाला, "जर दोष असे दिसत असतील तर मी तुझ्याशी १० वेळा लग्न करेन. मला त्याची पर्वा नाही". रॉकीच्या या बोलण्याने हिनाचा चेहरा खुलतो.
दरम्यान, हिना आणि रॉकीसोबत 'पती पत्नी और पंगा' या शोमध्ये अविका गौर-मिलिंद, रुबिना दिलैक-अभिनव शुक्ला, गुरमीत चौधरी-देबिना बॅनर्जी, स्वरा भास्कर-फहाद अहमद, सुदेश लहरी-ममता लहरी, गीता फोगट-पवन हे कलाकार दिसणार आहेत. या शोचं सूत्रसंचालन सोनाली बेंद्रे आणि मुन्नवर फारुकी करत आहेत.