या अभिनेत्रीवर रूममेटने केला जीवघेणा हल्ला, चेहरा विद्रूप करण्याचाही प्रयत्न 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 12:22 IST2019-08-29T12:19:58+5:302019-08-29T12:22:12+5:30

टीव्ही शो ‘नामकरण’ आणि ‘स्पिल्ट्सविला’ फेम अभिनेत्रीने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला. होय, एका प्राणघातक हल्ल्यातून ती थोडक्यात बचावली.

splitsvilla and naamkarann fame nalini negi accuses her roommate preeti rana of physical assault | या अभिनेत्रीवर रूममेटने केला जीवघेणा हल्ला, चेहरा विद्रूप करण्याचाही प्रयत्न 

या अभिनेत्रीवर रूममेटने केला जीवघेणा हल्ला, चेहरा विद्रूप करण्याचाही प्रयत्न 

ठळक मुद्देनलिनीच्या आई वडिलांना हे प्रकरण माहित होताच ते मुंबई आलेत आणि त्यांनी प्रीती व तिच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला.

टीव्ही शो ‘नामकरण’ आणि ‘स्पिल्ट्सविला’ फेम अभिनेत्री नलिनी नेगी हिने नुकताच एक धक्कादायक खुलासा केला. होय, नलिनी एका प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावली.  रूममेल प्रीती राणा आणि तिची आई या दोघींनी मिळून नलिनीला मारहाण केली. केवळ इतकेच नाही तर काचेच्या ग्लासने तिचा चेहरा विद्रूप करण्याचेही प्रयत्न केलेत. स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत नलिनीने ही आपबीती सांगितली.

तिने सांगितले की, ‘गेल्या काही वर्षांपासून प्रीती राणा माझी रूममेट होती. काही महिन्यांपूर्वीं मी फ्लॅट बदलला आणि ओशिवारामध्ये एक नवा फ्लॅट घेतला. यामुळे प्रीती जुन्या फ्लॅटमध्ये एकटी राहू लागली. पण काही दिवसांनंतर प्रीती माझ्याकडे आली आणि तिने माझ्यासोबत राहण्याची विनंती केली. मी सुद्धा तयार झाले. मला माझ्या आई-वडिलांसोबत राहायचे होते, म्हणून मी नवा फ्लॅट घेतला होता. त्यावेळी माझे आई-वडिल दिल्लीत माझ्या बहिणीकडे होते. त्यामुळे मी प्रीतीला सोबत राहू दिले. काही दिवसांनंतर माझे आईवडिल आलेत की, तुला इथून जावे लागेल, असे मी प्रीतीला सांगितले. पण दुसºयाच दिवशी प्रीतीची आई माझ्या फ्लॅटमध्ये राहायला आली. मी काहीच बोलले नाही. प्रीतीच्या मदतीसाठी ती आली असेल, असेच मला वाटले. पण गेल्या आठवड्यात ती माझ्याशी अचानक भांडू लागली.

मी जिमला निघाले असताना प्रीतीच्या आईने माझ्याशी भांडण उकरून काढले. मी शांत होते. पण तरीही तिने प्रीतीला फोन करून बोलवून घेतले. प्रीती लगेच घरी आली आणि तीही माझ्याशी भांडू लागली. मी माझी बाजू मांडणार तोच त्या दोघी मायलेकींनी माझ्यावर हल्ला केला. तिच्या आईने काचेचा ग्लास उचलला आणि माझ्या चेह-यावर हल्ला केला. मी खाली पडले. त्यांनी दोघांनी मला खूप मारहाण केली. मी कशीबशी या हल्ल्यातून बाहेर पडले.’

नलिनीच्या आई वडिलांना हे प्रकरण माहित होताच ते मुंबई आलेत आणि त्यांनी प्रीती व तिच्या आईविरोधात गुन्हा दाखल केला.

Web Title: splitsvilla and naamkarann fame nalini negi accuses her roommate preeti rana of physical assault