​चाहुल मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार भूत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2017 14:14 IST2017-04-05T08:44:44+5:302017-04-05T14:14:44+5:30

चाहूल मालिकेमध्ये सध्या बऱ्याच अघटित गोष्टींची चाहूल भोसलेकरांना जाणवत आहे. आता शांभवी आणि सर्जामध्ये मैत्रीच्या नव्या नात्याला सुरुवात झाली ...

The spectator will be seen in the ghazal series | ​चाहुल मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार भूत

​चाहुल मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार भूत

हूल मालिकेमध्ये सध्या बऱ्याच अघटित गोष्टींची चाहूल भोसलेकरांना जाणवत आहे. आता शांभवी आणि सर्जामध्ये मैत्रीच्या नव्या नात्याला सुरुवात झाली आहे. शांभवीला लहानपणापासून एक दैवी देणगी आहे आणि त्याचाच फायदा वाड्यातील अनेक रहस्य सोडवण्यासाठी शांभवीला होत आहे. शांभवीला अमानवी शक्ती, आत्मा आणि अघटित गोष्टींची चाहूल लागते, तिला तिच्या जवळपास असलेल्या या सगळ्या गोष्टी समजतात. त्यामुळे वाड्यातील अशाच अमानवी, अघटित गोष्टींचे रहस्य शांभवीला हळूहळू कळते आहे. येत्या आठवड्यामध्ये भोसले वाड्यामध्ये एका भुताची एंट्री होणार आहे. हे भूत शांभवीच्या मार्गात कोणते अडथळे निर्माण करणार? हे पाहणे नक्कीच रंजक ठरणार आहे.
शांभवीला भोसले वाड्यामध्ये असलेल्या भुताची चाहूल लागली आहे आणि ती त्या भुताच्या मागावर आहे. निर्मलाला मात्र या सगळ्या प्रकरणामुळे सर्जाला सत्य कळण्याची कुठे ना कुठे भीती लागून राहिली आहे. त्यामुळे निर्मलाने शांभवीला चकवा देण्यासाठी भोसले वाड्यामध्ये लहान भूत आणले आहे जिचे नाव स्नेहा आहे. शांभवी निर्मलाच्या या जाळ्यात अडकली आहे. कारण वाड्यातील हे भूत म्हणजे आठ वर्षांची लहान मुलगी स्नेहाच आहे असे तिला वाटायला लागले आहे. या सगळ्यामुळे निर्मला प्रचंड खूश आहे. यामुळे निर्मलाला हव्या तशा सगळ्या गोष्टी घडत आहेत. हे वाड्यातील नवीन भूत वाड्यातील सगळ्यांनाच घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. या भुताचा वावर संपूर्ण वाड्यात आहे. सगळ्यांनाच आता या भुताची भीती वाटू लागली आहे. पण या सगळ्यात शांभवी या भूतावर कब्जा करून तिच्याकडून सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. या सगळ्यामुळे मालिकेच्या कथानकाला चांगलेच वळण मिळणार आहे. 

Web Title: The spectator will be seen in the ghazal series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.