'भांगेत कुंकू भरलं, मी किंचाळले...', 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडननं सांगितले उज्जैनमधील धक्कादायक अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 18:24 IST2023-02-08T18:24:32+5:302023-02-08T18:24:59+5:30
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडनने उज्जैनमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितले आहे.

'भांगेत कुंकू भरलं, मी किंचाळले...', 'भाबीजी घर पर है' फेम सौम्या टंडननं सांगितले उज्जैनमधील धक्कादायक अनुभव
टेलिव्हिजन अभिनेत्री सौम्या टंडन(Saumya Tandon)ला कोणत्याही परिचयाची गरज नाही. काही काळापासून ती अभिनय क्षेत्रापासून दुरावली आहे. मात्र, अभिनयापासून अंतर राखूनही ती प्रसिद्धीच्या झोतात राहते. आता अभिनेत्रीने एका भयानक घटनेबद्दल सांगितले आहे. हॉटरफ्लायला दिलेल्या मुलाखतीत सौम्या टंडनने सांगितले की, ती उज्जैनमध्ये छेडछाडीची शिकार झाली होती.
सौम्या टंडन म्हणते, 'मी हिवाळ्यात रात्री घरी परतत होते. तेवढ्यात एका मुलाने बाईक थांबवली आणि माझ्या भांगेत सिंदूर भरले. या घटनेने सौम्या टंडन आतून खूप घाबरली. यानंतर सौम्याने आणखी एका भयानक घटनेचा उल्लेख केला. सौम्या सांगते की, एकदा ती शाळेतून घरी परतत होती. ती सायकलवरून जात होती आणि यादरम्यान तिला एकाने ओव्हरटेक केले. त्यामुळे सौम्या रस्त्यावर पडली. या अपघातात अभिनेत्रीच्या डोक्याला दुखापत झाली असून तिचे हाड फ्रॅक्चर झाले होते.
या अपघाताबाबत अधिक बोलताना सौम्या सांगते की, ती रस्त्यावर वेदनेने ओरडत होती, पण त्यावेळी तिच्या मदतीसाठी कोणीही पुढे आले नाही. म्हणूनच सौम्या जोपर्यंत उज्जैनमध्ये राहिली तोपर्यंत तिला स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी लागली. तिथे कधी रस्त्यावर पोरांनी तिचा पाठलाग केला, तर कधी भिंतींवर घाणेरड्या गोष्टी लिहिल्या.
अभिनेत्रीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, सौम्या टंडनने २००८ मध्ये अफगाणी मालिका 'खुशी'मधून तिच्या करिअरची सुरुवात केली. यानंतर तिने काही शो होस्टही केले. सौम्या टंडन करीना कपूर आणि शाहिद कपूर स्टारर चित्रपट 'जब वी मेट' मध्ये दिसली आहे. पण तिला खरी लोकप्रियता 'भाबीजी घर पर है' या शोमधून मिळाली. 'भाबीजी घर पर है' सोडल्यानंतर सौम्या टंडन एका नवीन आणि रोमांचक प्रोजेक्टची वाट पाहत आहे.