"माझं मन खूप दुखावलंय...", 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्यात झालेली नक्कल पाहून सूरज चव्हाण नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 16:38 IST2026-03-15T16:38:19+5:302026-03-15T16:38:38+5:30

'झी चित्र गौरव पुरस्कार २०२६' सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात काही कॉमेडी स्किट सादर करण्यात आले होते. यातीलच एका स्किटमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस मराठी ५चा विजेता सूरज चव्हाणची नक्कल करण्यात आली. पण यामुळे सूरज चव्हाण नाराज झाला आहे.

sooraj chavan gets upset after seen his character play in zee marathi chitra gaurav award 2026 | "माझं मन खूप दुखावलंय...", 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्यात झालेली नक्कल पाहून सूरज चव्हाण नाराज

"माझं मन खूप दुखावलंय...", 'झी चित्र गौरव पुरस्कार' सोहळ्यात झालेली नक्कल पाहून सूरज चव्हाण नाराज

'झी चित्र गौरव पुरस्कार २०२६' सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्यात काही कॉमेडी स्किट सादर करण्यात आले होते. यातीलच एका स्किटमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि बिग बॉस मराठी ५चा विजेता सूरज चव्हाणची नक्कल करण्यात आली. पण यामुळे सूरज चव्हाण नाराज झाला आहे. सूरजने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन व्हिडीओ शेअर करत सोहळ्याला बोलवलं नसल्याची खंत व्यक्त केली आहे. 

व्हिडीओमध्ये सूरज चव्हाण काय म्हणाला? 

"काही कारणांमुळे मी आज हा व्हिडिओ बनवतोय. कारण माझं मन इतकं दुखावलं... ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्यात माझं कॅरेक्टर प्ले करण्यात आलं, याचा मला प्रचंड आनंद आहे. पण, माझ्या मनात एक खंत आहे. माझ्या मनाला एक गोष्ट खूप लागलीये. झी चित्र गौरव हा एवढा मोठा शो आहे. त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये. ते सगळे खूप मोठे लोक आहेत. पण, मला त्यांनी बोलावलं असतं आणि कुठल्या तरी कोपऱ्यात जरी बसवलं असतं तरी मला बरं वाटलं असतं. पण, मला फोनही केला नाही, बोलावलं सुद्धा नाही. हे पाहून माझं मन दुखावलंय. मी माझ्या चाहत्यांना देव मानतो. तुमच्या मनात आहे ना मी टॉपचा किंग, त्यामुळे मी जो आहे तो माझ्या आई-वडिलांमुळे आणि संपूर्ण महाराष्ट्रामुळे आहे", असं सूरज म्हणाला. 

पुढे सूरज म्हणतो,  "त्या लोकांनी सूरज चव्हाणचं कॅरेक्टर एक नंबर केलंय. मलाही या गोष्टीचा प्रचंड आनंद आहे. माझे फॅन्स ते कॅरेक्टर पाहून चाहते पण खूप हसले. मला याचा अभिमान आहे. पण मला एक खंत आहे, तो सोहळा सुरू असताना एका तरी बाजूला मी कुठेतरी पाहिजे होतो, एवढीच माझी अपेक्षा होती".


"माझ्या फॅन्सना मी देव मानतो आज मी तुम्हाला आणि माझ्या महाराष्ट्राला एकच प्रश्न विचारतो, त्यांनी मला सोहळ्याला बोलावलं पाहिजे होतं की नाही? खरं सांगा" असं म्हणत सूरज चव्हाणने खंत व्यक्त केली आहे. 
 

Web Title : ज़ी चित्र गौरव में नकल होने पर सूरज चव्हाण हुए नाराज़!

Web Summary : ज़ी चित्र गौरव पुरस्कार 2026 में अपनी नकल किए जाने पर सोशल मीडिया इन्फ्लुएंसर सूरज चव्हाण नाराज़ हैं। उन्होंने कार्यक्रम में आमंत्रित नहीं किए जाने पर निराशा व्यक्त की, हालाँकि एक नाटक में उनका किरदार निभाया गया था। चव्हाण ने इंस्टाग्राम पर एक वीडियो में अपनी भावनाएँ साझा कीं।

Web Title : Suraj Chavan upset after mimicry at Zee Chitra Gaurav!

Web Summary : Social media influencer Suraj Chavan is upset after being mimicked at the Zee Chitra Gaurav Awards 2026. He expressed disappointment for not being invited to the event, even though his character was portrayed in a skit. Chavan shared his feelings in a video on Instagram.