​सोनू परतला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2016 16:48 IST2016-09-14T11:18:37+5:302016-09-14T16:48:37+5:30

इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या आतापर्यंतच्या सिझनमध्ये पहिला सिझन हा प्रचंड गाजला होता. या कार्यक्रमातील स्पर्धक, परीक्षक हे आजही प्रेक्षकांच्या ...

Sonu Return | ​सोनू परतला

​सोनू परतला

डियन आयडल या कार्यक्रमाच्या आतापर्यंतच्या सिझनमध्ये पहिला सिझन हा प्रचंड गाजला होता. या कार्यक्रमातील स्पर्धक, परीक्षक हे आजही प्रेक्षकांच्या चांगलेच स्मरणात आहेत. पहिल्या सिझनमधील अन्नू मलिक, फरहा खान आणि सोनू निगम यांची तिकडी प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. या कार्यक्रमातील सोनूचे परीक्षण प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. सोनू जवळजवळ पाच-सहा वर्षांनंतर छोट्या पडद्यावर परतत असून तो इंडियन आयडल या कार्यक्रमाचे पुन्हा एकदा परीक्षण करणार आहे. इंडियन आयडलच्या नवीन सिझनची नुकतीच घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर या कार्यक्रमात परीक्षक कोण असणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. सोनू परत आल्याने त्याच्या फॅन्सना आता नक्कीच आनंद होणार आहे.

Web Title: Sonu Return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.