सोनीवर कुछ रंग प्यार के ऐसे भी, एक दुजे के वास्ते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 04:08 IST2016-03-05T11:08:21+5:302016-03-05T04:08:21+5:30

सोनी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कुछ रंग प्यार के ऐसे भी आणि एक दुजे के वास्ते या मालिकेचे लाँचिंग झाले.  सासू-सुनेच्या ...

Sonnyar some colors of love like this, for a couple | सोनीवर कुछ रंग प्यार के ऐसे भी, एक दुजे के वास्ते

सोनीवर कुछ रंग प्यार के ऐसे भी, एक दुजे के वास्ते

नी एंटरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कुछ रंग प्यार के ऐसे भी आणि एक दुजे के वास्ते या मालिकेचे लाँचिंग झाले.  सासू-सुनेच्या कंटाळवाण्या सिरीअल चालू असताना दोन नवीन रोमँटिक सिरीअल आल्या आहेत. संबंधामधील जटीलता हा याचा मुख्य बिंदू आहे.
कुछ रंग प्यार के ऐसे भी ही भावनिक कथा आहे. ईश्वरी (सुप्रिया पिळगावकर) आणि देव (शाहीर शेख) ही मायलेकाची जोडी आहे. देव हा आईचा लाडका आहे. तो आपल्या आईची सेवा करतो. शाहीरने यात जबरदस्त अभिनय केला आहे. सुप्रिया ही लोकप्रिय आहेच. या ठिकाणीही तिने सुंदर अभिनय केला आहे. एरिका फर्नांडिसने सोनाक्षीची भूमिका छान निभावलीय. 
एक दुजे के वास्ते या मालिकेने सुरुवातीपासूनच महिलांना आपलेसे केले आहे. ही प्रत्येक महिलेची कथा आहे. निकीता दत्ता (सुमन) ही घरात आणि आॅफिसमध्ये जबाबदारीने काम करते आहे. लंडनहून भारतामध्ये आलेल्या श्रावण (नमिक पॉल) यांच्याशी ती गुपचूपप्रमाणे प्रेम करते. नमीक पॉल पहिल्यांदाच टेलिव्हिजनवर काम करीत आहे. 
या दोन्ही प्रेमकथांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे. सोमवार ते शुक्रवारी रात्री ९.३० आणि १०.०० वाजता सोनीवर प्रसारित होत आहेत. 

Web Title: Sonnyar some colors of love like this, for a couple