​सोनाली कुलकर्णी दिसणार आरंभ या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2017 12:55 IST2017-07-12T07:25:03+5:302017-07-12T12:55:03+5:30

सोनाली कुलकर्णी हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. तिने आतापर्यंत मराठी चित्रपटांमध्ये अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या ...

Sonali Kulkarni sees the beginning or series | ​सोनाली कुलकर्णी दिसणार आरंभ या मालिकेत

​सोनाली कुलकर्णी दिसणार आरंभ या मालिकेत

नाली कुलकर्णी हे नाव आज मराठी चित्रपटसृष्टीत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. तिने आतापर्यंत मराठी चित्रपटांमध्ये अनेक दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. मराठीप्रमाणेच बॉलिवूडमध्येदेखील तिने आपले प्रस्थ निर्माण केले आहे. मिशन काश्मीर, दिल चाहता है यांसारख्या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. सोनाली ही अतिशय चांगली अभिनेत्री असल्याने तिला चित्रपट, मालिकांच्या ऑफर या नेहमी येतच असतात. सोनालीला नुकतीच एका हिंदी मालिकेची ऑफर मिळाली आहे.
आरंभ या मालिकेची पटकथा ही के.व्ही. विजयेंद्र प्रसाद यांची असून या मालिकेचे दिग्दर्शन गोल्डी बहेल करत आहे. त्यामुळे या मालिकेची सध्या चांगलीच चर्चा आहे. याशिवाय या मालिकेत तनुजा मुखर्जी, तेज सप्रू, रजनीश दुग्गल, कार्तिका नायर प्रमुख भूमिका साकारत आहेत. या मालिकेच्या दिग्गज कलाकारांच्या यादीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा देखील समावेश होणार असल्याचे कळतेय. 
सोनाली कुलकर्णी तमन्ना या मालिकेत एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसली होती आणि आता ती आरंभ या मालिकेत झळकणार असल्याचे कळतेय. या मालिकेत ती महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. या मालिकेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून कळतेय की, या मालिकेत सगळ्याच व्यक्तिरेखा अतिशय ताकदवान आहेत. कोणतीही व्यक्तिरेखा सहजतेने साकारण्याची क्षमता आणि कला सोनालीकडे आहे असे या मालिकेच्या टीमचे म्हणणे असल्याने या मालिकेतील एका महत्त्वाच्या भूमिकेसाठी तिला विचारण्यात आले आहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणे घडल्यास सोनालीचा समावेश लवकरच द्रविडांच्या कंपूत होणार असल्याचे कळतेय. अनेक अभिनेत्रींमधून या भूमिकेसाठी सोनालीची निवड करण्यात आली आहे. 

Also Read : प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’चा टीझर प्रदर्शित!

Web Title: Sonali Kulkarni sees the beginning or series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.