सोनाली कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे देतायेत मोलाचे सल्ले?जाणून घेवूयात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2017 13:57 IST2017-03-04T11:29:00+5:302017-03-06T13:57:06+5:30

विधात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू... एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा साजरा कर तू...असं म्हणत एक मुलगी हि घराची शोभा असते,स्त्री ...

Sonali Kulkarni, Mrinmayi Deshpande's Advice on Advantage? | सोनाली कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे देतायेत मोलाचे सल्ले?जाणून घेवूयात?

सोनाली कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे देतायेत मोलाचे सल्ले?जाणून घेवूयात?

धात्याच्या नवनिर्माणाची कलाकृती तू... एक दिवस तरी स्वतःच्या अस्तित्वाचा साजरा कर तू...असं म्हणत एक मुलगी हि घराची शोभा असते,स्त्री गुह्लक्ष्मी असते,बहिण भावाच्या मनगटावर असेलेली शान असते. समाजात, घरात स्त्रीचे स्थान खूप महत्वाचे आहे. एक स्त्री जितक्या कुशलतेने घर सांभाळते अगदी तितक्याच कुशलतेने ती काम, व्यवहार या देखील जबाबदारी पार पाडत असल्याचे दिसून येते. बाकीच्या क्षेत्रात देखील स्त्रीयांचा ठसा उमटलेला दिसून येतो. महिला दिवसाचे निमित्ताने लाडक्या कलाकारांनी काही मोलाचे सल्ले दिले जे त्यांनी लोकमतशी संवाद साधताना सांगितले.

सोनाली कुलकर्णी ( कॉमेडीची बुलेट ट्रेन ) : मुलगा जन्माला आल कि जबाबदारी जास्त वाढते




“अगदी लहानपणापासून मुलींना सांगितल जातं कि, हे करू नकोस गं बाई, असे कपडे घालू नकोस हं, असच बोल हे बोलू नकोस, इतक्या वाजता घरी ये, मग या सगळ्या गोष्टी मुलाला का नाही सांगितल्या जात? आपण अनेक गोष्टी मुलींना शिकवतो मुलाला का नाही शिकवत? मला अस वाटत मुलगी घरात जन्माला आली कि जबाबदारी वाढते यापेक्षा मुलगा जन्माला आला कि पालकांची जबाबदारी जास्त वाढायला हवी. मुलावर मुलीला जसे लहानपणापासूनच शिकवले जाते तसेच संस्कार मुलालाही देणे गरजेचे आहे.जेव्हा याची जाणीव समाजाला होईल तेंव्हा समाजातील सगळ्या मुली सुरक्षित होतील. ती जाणीव होणं गरजेच आणि महत्वाचे आहे.

मृणाल दुसानीस ( अस्स सासर सुरेख बाई ) : ते प्रेम म्हणजे खरी स्त्री शक्ती



“मला अस वाटत स्त्री शक्तीचा जागर सगळीकडे होत असतो, स्त्रीया सक्षम आहेत, सगळ्या क्षेत्रात अग्रेसर आहेत त्यांच्यात आत्मविश्वास आहे, त्यांनी स्वत: ला आणि त्यांच्या क्षमतेला सिद्ध देखील केल आहे. हे सगळे करत असताना मात्र सध्य स्थिती पाहाता स्त्रियांनी  आपले आई – वडिल, सासू – सासरे, नवरा – मुलं आणि आपल्याशी जोडल्या गेलेल्या दोन्ही कुटुंबातील लोकांचा आधार होणे जास्त गरजेच आहे. 

मृण्मयी देशपांडे ( कॉमेडीची बुलेट ट्रेन ) : स्वत:च स्वत:च्या स्वप्नातील राजकुमार बना 



“अस खूप वेळा दिसून येत कि, मुलींच्या मनात नेहेमी एक भावना येते कि, मला अमुक अडचणीमधून माझ्या स्वप्नातील राजकुमार वाचवेल, किंवा हा राजकुमार माझे स्वप्न पूर्ण करेल... असा कोणी राजकुमार येईल आणि तुमच्या आयुष्यातील अडचणी, प्रश्न सोडवले याची वाट बघण्यापेक्षा तुम्हीच तुमच्या स्वप्नातील राजकुमार बना. मुलांकडून अवास्तव अपेक्षा बाळगण्यापेक्षा तुम्ही त्या गोष्टी आयुष्यात मिळवू शकाल, त्या अडचणी सोडवू शकाल इतके सक्षम बना, स्वत:च्या पायावर उभे रहा, मी इतकच सांगेन.

शाश्वती पिंपळीकर ( चाहूल ) : स्वत:चा मान राखा



स्वत:ला कमी लेखू नका, कारण अस झाल तर लोक त्याचा फायदा घेण्यासाठी नेहेमीच बसलेले असतात. स्त्री म्हणून तुमचा जन्म झाला याचा अभिमान बाळगा. स्वत:ला सक्षम बनवा. स्त्री म्हणून तुमचा जन्म झाला आहे त्याचा उगाचच फायदा घेऊ नका. खंबीर बना आणि स्वत:चा मान राखा.जर तुम्ही स्वत: चा मान राखला तरच बाकीचे देखील तुम्हाला मान देतील हे विसरू नका.

Web Title: Sonali Kulkarni, Mrinmayi Deshpande's Advice on Advantage?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.