एखाद्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी जेव्हा अनेक कलाकार एकत्र येतात तेव्हा त्यांचे सगळ््यांशी जमेलच असे ...
सोनालीला आठवले चेकमेटचे दिवस
/> एखाद्या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी जेव्हा अनेक कलाकार एकत्र येतात तेव्हा त्यांचे सगळ््यांशी जमेलच असे नाही. परंतू काही कलाकार असे असतात जे चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आल्यावर त्यांच्यातील मैत्रीचा धागा अधिक घट्ट होतो अन मग ते कायमचेच फ्रेन्ड्स बनुन जातात. सोनाली खरे हीला देखील तिचे चेकमेट चित्रपटाचे दिवस पुन्हा आठवले आहेत. सोनाली म्हणतेय, मला चेकमेटचे दिवस पुन्हा आठवतायत. त्याचे झाले असे की सोनालीने नूकताच अंकुश चौधरी आणि स्वप्निल जोशी यांच्या सोबतचा फोटो अपलोड केला आहे. चेकमेट या चित्रपटात हे तिघेही आपल्याला एकत्र पहायला मिळाले होते. एवढेच नाही तर सोनाली म्हणतीये मी माझ्या या दोन मित्रांसोबत तब्बल सात वर्षांनी फोटो काढीत आहे. रिव्हीझीटेड चेकमेट डे अशा शब्दांमध्ये ती तिच्या भावना सध्या व्यक्त करीत असुन या फोटोमध्ये संजु दादाला देखील ती मिस करतेय.