कधी मुंबईत तर कधी दुबईत
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 17:08 IST2016-06-16T11:38:49+5:302016-06-16T17:08:49+5:30
निगार खान सध्या बालवीर या मालिकेत प्रचंडिका ही व्यक्तिरेखा साकारत आहे. निगारचे लग्न झाल्यानंतर ती या मालिकेद्वारे पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या ...

कधी मुंबईत तर कधी दुबईत
न गार खान सध्या बालवीर या मालिकेत प्रचंडिका ही व्यक्तिरेखा साकारत आहे. निगारचे लग्न झाल्यानंतर ती या मालिकेद्वारे पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. निगार लग्नानंतर दुबईत राहात असल्याने तिच्यासाठी कोणत्याही मालिकेसाठी दिवसातील २०-२५ दिवस देणे शक्य नव्हते. बालवीर या मालिकेचे चित्रीकरण केवळ महिन्यातून दहा दिवसच करावे लागणार असल्याने तिने या मालिकेसाठी होकार दिला आहे. सध्या निगार मुंबई आणि दुबई असा प्रवास महिन्यातून कित्येक वेळ करत आहे. या मालिकेत निगार एका नकारात्मक भूमिकेत असून या भूमिकेसाठी तिचा लूकही वेगळा आहे. या मालिकेत तिने जांभळ्या रंगाची लिपस्टिक लावलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे.