कुणी तरी येणार येणार गं...! 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, फ्लॉन्ट केला बेबी बंप
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 17:31 IST2023-05-27T17:31:26+5:302023-05-27T17:31:45+5:30
Aai Kuthe Kay Karte : आई कुठे काय करतेमधील अभिनेत्रीने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली खुशखबर

कुणी तरी येणार येणार गं...! 'आई कुठे काय करते' फेम प्रसिद्ध अभिनेत्री होणार आई, फ्लॉन्ट केला बेबी बंप
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार घराघरात पोहचले आहेत. या कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतात. दरम्यान आता या मालिकेतील अभिनेत्री राधा सागर (Radha Sagar) हिने चाहत्यांना खुशखबर दिली आहे. ती लवकरच आई होणार आहे. नुकताच तिने एक सुंदर व्हिडीओ शेअर करत ही गोड बातमी दिली आहे.
आई कुठे काय करते, सुंदरा मनामध्ये भरली यांसारख्या कार्यक्रमांमध्ये राधाने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तिने साकारलेल्या भूमिकांचे सर्वत्र कौतुकही झाले. आता राधाने तिच्या कामामधून ब्रेक घेतला आहे. यामागचे कारणंही तितकेच खास आहे. राधाने एक व्हिडीओ शेअर करत प्रेग्नेंट असल्याची बातमी शेअर केली आहे. तिचा गरोदरपणातील व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे.
राधाने तिचा पती सागर याच्याबरोबर प्रेग्नेंसी फोटोशूट केले आहे. याशिवाय सुंदर व्हिडीओही शूट केला. हाच व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामद्वारे शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती खूप आनंदी दिसत आहे. तसेच वेस्टर्न कपडे परिधान करुन तिने खास फोटोशूट केले आहे. राधाच्या चेहऱ्यावर प्रेग्नेंसी ग्लो दिसून येत आहे. काही मिनिटांमध्येच तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे.
राधासाठी हा दिवस खास आहे. कारण आज तिचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त ही गोड बातमी तिने सगळ्यांबरोबर शेअर केली. व्हिडीओ शेअर करत राधाने म्हटलं की, आमच्या आयुष्यामधील सगळ्यात उत्तम बातमी सांगण्यासाठी हा चांगला दिवस आहे. मला वाढदिवसाच्या शुभेच्छा. या व्हिडीओनंतर तिचे चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.