लग्नानंतर सोहम बांदेकरची पहिली पोस्ट, नवरा झाल्यावर म्हणतो- "आयुष्यातील हा क्षण म्हणजे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 15:36 IST2025-12-03T15:34:43+5:302025-12-03T15:36:29+5:30
मोठ्या थाटामाटात सोहम-पूजाचा लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर सोहमने पहिली पोस्ट केली आहे.

लग्नानंतर सोहम बांदेकरची पहिली पोस्ट, नवरा झाल्यावर म्हणतो- "आयुष्यातील हा क्षण म्हणजे..."
आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहम बांदेकर नुकताच लग्नाच्या बेडीत अडकला आहे. सोहमने अभिनेत्री पूजा बिरारीशी सप्तपदी घेत लग्नगाठ बांधली. कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या आशीर्वादाने सोहम आणि पूजाने नव्या आयुष्याला सुरुवात केली. मोठ्या थाटामाटात सोहम-पूजाचा लग्नसोहळा पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. लग्नानंतर सोहमने पहिली पोस्ट केली आहे.
सोहम बांदेकरने लग्नातील काही खास क्षणांचे पूजासोबतचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत त्याने खास पोस्टही लिहिली आहे. "आयुष्यातील हा क्षण म्हणजे कायम एकमेकांसोबत राहण्याची खरी सुरुवात. २.१२.२०२५", असं कॅप्शन त्याने या फोटोंना दिले आहेत. सोहमच्या या पोस्टवर कमेंट करत चाहते आणि सेलिब्रिटींनी दोघांनाही त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सोहम आणि पूजाने लग्नासाठी खास गुलाबी रंगाच्या कपड्यात ट्विनिंग केलं होतं. पूजाने गुलाबी साडी नेसून पारंपरिक लूक केला होता. तर शेरवानी सूटमध्ये सोहम राजबिंडा दिसत होता. त्यांच्या लग्नाला मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती. पूजा एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. स्वाभिमान, येड लागलं प्रेमाचं या मालिकांमध्ये तिने काम केलं आहे. तर सोहम निर्मिती कंपनी सांभाळत आहे.