नन बनत सांसारिक सुखाचा त्याग करणारी सोफिया हयात पुन्हा एकदा पडली प्रेमात, मेक्सिकन बिझनेसमनला करते डेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2021 13:00 IST2021-04-05T12:45:47+5:302021-04-05T13:00:11+5:30
Sofia Hayat was living a nuns life till now, लग्न संस्थेवर विश्वास राहिला नसून एखादा चांगला बॉयफ्रेंड मिळाला तर त्याचा नक्की विचार करेन असं सोफियाने म्हटले होते

नन बनत सांसारिक सुखाचा त्याग करणारी सोफिया हयात पुन्हा एकदा पडली प्रेमात, मेक्सिकन बिझनेसमनला करते डेट
बिग बॉस या रियालिटी शोमध्ये वादात सापडलेली स्पर्धक सोफिया हयात कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेत असते.बोल्डनेस दाखत किंवा वादग्रस्त विधानं करत तसंच दररोज काही ना काही कारनामे करत साऱ्यांचे लक्ष वेधून घेण्याचा सोफिया प्रयत्न करत असते. कधी काळी तर तिने चक्क नन बनत सांसारिक सुखाचा त्याग करत अध्यात्मकडे वळल्याचेही नाटक केले. आता पुन्हा एकदा ही सोफिया चर्चेत आली आहे.
ती पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे.स्वतः सोफियाने तिच्या बॉयफ्रेंडसह रोमँटिक अंडाजातले फोटो शेअर केले आहेत.सोफिया हयात मेक्सिकोमधील बिजनेसमैन ऑस्करला डेट करत आहे. ऑस्करचे कुटूंब हे खूप आध्यात्मिक आहेत. ऑस्करसह फोटो शेअर करत तिने सांगितले की , मेक्सिकोमध्ये ती फिरायला आली होती. त्याचदरम्यान दोघांची भेट झाली. सध्या आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात आहोत.उद्या काय होईल माहीत नाही पण या क्षणी आम्ही दोघे एकमेकांस खूप आनंदी आहोत.
पती ब्लादला घटस्फोट दिल्यानंतर सोफियाने त्याला विसरल्याचे तिने एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते. लग्न संस्थेवर विश्वास राहिला नसून एखादा चांगला बॉयफ्रेंड मिळाला तर त्याचा नक्की विचार करेन असं सोफियाने म्हटले होते.
कुणी आवडलाच तर त्याला आधी पूर्णपणे जाणून घेईल आणि जो आपल्या दर्जाचा असेल अशाच व्यक्तीशी नातं जोडेल असं सोफियाने नमूद केले होते. शिवाय हा बॉयफ्रेंड ईर्ष्या बाळगणारा असू नये अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली होती.