म्हणून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम सोनालिकाने केला लुक चेंज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2017 22:01 IST2017-02-17T08:22:44+5:302017-02-17T22:01:07+5:30
हातात सिगारेट, ग्लॅमरस आणि तितक्याच डॅशिंग लूकमधील हा चेहरा ओळखीचा वाटत असेल ना. अगदी बरोबर ही हा चेहरा तुमच्या ...

म्हणून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम सोनालिकाने केला लुक चेंज
ह तात सिगारेट, ग्लॅमरस आणि तितक्याच डॅशिंग लूकमधील हा चेहरा ओळखीचा वाटत असेल ना. अगदी बरोबर ही हा चेहरा तुमच्या परिचयाचा आहे. या आहेत छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील रसिकांच्या लाडक्या माधवी भाभी. आता हा फोटो पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की माधवी भाभी आपल्या नेहमीच्या अंदाजात न दिसता अशा वेगळ्या लूकमध्ये कशा काय पाहायला मिळत आहेत. त्यांचा तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील लूक बदलणार की काय असा प्रश्नही तुम्हाला पडला असेल. तुमच्यासारखे अनेक प्रश्न सध्या सोशल मीडियावरील अनेकांना पडलेत. माधवी भाभी अर्थात मराठमोळ्या अभिनेत्री सोनालिका जोशी. सोशल मीडियावर सोनालिका यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या लूकविषयी चर्चा सुरु झाल्यात. मात्र सोनालिका यांची ही नवी कोणती भूमिका नाही. तसंच तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेतील मिसेस भिडे म्हणजेच माधवी भाभी यांचा लूकही काही बदलणार नाही. मात्र माधवी भाभी अर्थात सोनालिका जोशी यांनी हा हटके आणि मॉर्डन अंदाज धारण केला तो एका फोटोशूटसाठी. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत नेहमीच साधीभोळी राहणी आणि साडीत दिसणा-या सोनालिका जोशी यांनी काही दिवसांपूर्वी एक ग्लॅमरस फोटोशूट केले आहे. या फोटोशूटमधील हा एक फोटो विशेष लक्षवेधी ठरतो आहे. या फोटोसाठी घेतलेल्या पोजमध्ये सोनालिका जोशी यांचा डॅशिंग-ग्लॅमरस अंदाज दिसत असून त्यांच्या हातात सिगारेट आहे. सिगारेटचे कश घेताना त्या दिसत आहेत. त्यांची हेअरस्टाईलसुद्धा तितकीच हटके आहे. तारका मेहता का उल्टा चष्मा मालिकेत गोकुळधाम सोसायटीचे सेक्रेटरी भिडे मास्तर यांची पत्नी बनलेल्या माधवी यांचा हा मॉर्डन अंदाज सा-यांनाच सुखद धक्का देऊन जात आहे. या मालिकेत पापड लोणची बनवत कुटुंबाला आर्थिक हातभार लावणा-या माधवी भाभी अशा हटके लूकमध्येसुद्धा दिसतील याची कल्पनाही कुणी केली नसेल. माधवी भाभी अर्थात सोनालिका जोशी या मराठमोळ्या अभिनेत्री आहेत हे एव्हाना सगळ्यांना माहिती आहे. रिअल लाइफमध्ये समीर जोशी यांच्यासोबत त्यांचं लग्न झालं असून त्यांना आर्या नावाची एक मुलगी आहे. मराठी रंगभूमीपासून अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात करणा-या सोनालिका जोशी यांनी मराठी सिनेमातही काम केले आहे. याशिवाय काही टीव्ही शोच्या सूत्रसंचालकाची भूमिकाही त्यांनी बजावलीय. मात्र खरी लोकप्रियता आणि ओळख त्यांना मिळवून दिली ती तारक का उल्टा चष्मा या मालिकेने. या मालिकेतील प्रत्येक पात्राने मग ते दया-जेठा असो किंवा रोशन-रोशन, अय्यर कुटुंबीय, हाथी कुटुंबीय, सोधी कुटुंब किंवा मग मेहता कपल असो. प्रत्येक पात्र खास आहेच. मात्र त्यातल्या त्यात मराठमोळ्या माधवी भाभी आणि भिडे मास्तर या मराठमोळ्या कुटुंबाने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवले आहे. आता माधवी भाभीच्या या नव्या ग्लॅमरस लूकमुळे सोनालिका जोशी यांची चर्चा तर होणारच नाही का !