म्हणून बिग बॉसची ही Ex-कंटेस्टंट शिल्पा शिंदेला भेटणं टाळते,जाणून घ्या कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2018 16:16 IST2018-02-23T10:46:22+5:302018-02-23T16:16:22+5:30

बिग बॉस सिझन 11 मध्ये इतके दिवस एकत्र राहिल्याने प्रत्येकाशीच एक वेगळीच अटॅचमेंट झाली होती.त्यामुळे घरात कितीही रूसवे-फुगेल या ...

So, the Big Boss's Ex-Contestant Shilpa avoids meeting Shinde, know the reason | म्हणून बिग बॉसची ही Ex-कंटेस्टंट शिल्पा शिंदेला भेटणं टाळते,जाणून घ्या कारण

म्हणून बिग बॉसची ही Ex-कंटेस्टंट शिल्पा शिंदेला भेटणं टाळते,जाणून घ्या कारण

ग बॉस सिझन 11 मध्ये इतके दिवस एकत्र राहिल्याने प्रत्येकाशीच एक वेगळीच अटॅचमेंट झाली होती.त्यामुळे घरात कितीही रूसवे-फुगेल या स्पर्धकांमध्ये दिसले तरीही ते आता सगळेच एकमेकांचे चांगले मित्र बनले आहेत. 'बिग बॉस 11' हा रिअॅलिटी शो संपून एक महिना झालाय. आता यामधील सर्वच कंटेस्टेंट आपापल्या आयुष्यात बिझी असले तरीही ते एकमेकांना वेळात वेळ काढुन भेटत असल्याचे पाहायला मिळत आहे. खास करून शिल्पा शिंदेला सगळेच स्पर्धक खूप मिस करत आहेत.त्यामुळे  विकास मेहजबी सिद्दीकी, सब्यसाची सत्पथीने आणि लव्ह त्यागीने  शिल्पा शिंदेच्या घरी येऊन शिल्पाची भेट घेतली.पुन्हा एकदा सा-यांनीच त्यांचे बिग बॉसच्या घरातल्या आठवणींना ऊजाळा दिला.मात्र यांत एक कंटेस्टंट आहे जिने शिल्पाला भेटण्याचे टाळले असल्याचे समजते.बिग बॉसच्या घरात हिना खान आणि तिची कधीच गट्टी जमली नाही. या दोघींनी नेहमीच एकमेकींच्या विरोधात भूमिका घेतली. आता घराबाहेर पडल्यानंतरही दोघींमध्ये कोल्ड वॉर सुरू असल्याचे दिसते. कारण दोघींना एकत्र येण्याचा जेव्हा प्रसंग येतो तेव्हा त्या टाळण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. याशिवाय अर्शी खानसोबतचे संबंधही शिल्पाने पूर्णपणे तोडल्याचे दिसून येते. 

Also Read:शिल्पा शिंदेला विजेती घोषित करणे फिक्स होते; हिना खानच्या चाहत्यांनी केला आरोप!

शोच्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये हिनाने विकास गुप्ता आणि पुनीश शर्माला मागे टाकत शिल्पासोबत फायनलमध्ये स्थान मिळविले होते.जेव्हा सलमानने शिल्पाला विजेती घोषित केले तेव्हा त्याने म्हटले की,शिल्पाने हिनाला काही वोटच्या फरकानेच मात दिली आहे.त्यामुळे हिनाच्या चेह-यावरील दु:ख स्पष्टपणे दिसत होते.यावेळी सलमानने शिल्पाला विजेती ट्रॉफी देतानाच ४४ लाख रूपयांचा धनादेशही दिला.तेव्हापासून हिनाचे चाहते सोशल मीडियावर शोचा विनर फिक्स असल्याचे म्हणत आहे.ट्विटरवर तर चाहत्यांचा संताप खूपच दिसत असून,शिल्पालाही त्यांच्याकडून टार्गेट केले गेले होते.तसेच सगळ्यात जास्त लोकप्रिय सेलिब्रेटीचा तोरा मिरवत या शोचे विजेती हिनाच ठरणार असे तिला वाटत होते.इतकेच नाहीतर बिग बॉसमध्ये एंट्री करण्याआधीच हिना खानने शोच्या फायनलपर्यंत ती असणार असा निर्मांत्याबरोबर कॉन्ट्रक्टही केला असल्याचे बोलले गेले.कॉन्ट्रॅक्टनुसार हिना खान फायनलपर्यंत पोहचणार असल्याच्या चर्चाही रंगल्या.मात्र शिल्पा शिंदे विजेती जाहीर होताच हिना खानचा पारा चढला आणि घराबाहेर येताच तिने बिग बॉसच्या टीमसह वाद घालण्यास सुरूवात केली असल्याची चर्चांना उधाण आले होते. 

Web Title: So, the Big Boss's Ex-Contestant Shilpa avoids meeting Shinde, know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.