म्हणून अभिनेता शालीन भानोतने दिली सुवर्णमंदिराला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2017 16:56 IST2017-02-16T11:26:45+5:302017-02-16T16:56:45+5:30

‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ ही पंजाबमधील शाही घराण्यावरील आगामी मालिका सर्वाधिक लोकप्रिय मालिका ठरावी यासाठी मालिकेची टीम खूप ...

So actor Shalin Bhanot gave a gift to Golden Temple | म्हणून अभिनेता शालीन भानोतने दिली सुवर्णमंदिराला भेट

म्हणून अभिनेता शालीन भानोतने दिली सुवर्णमंदिराला भेट

ेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ ही पंजाबमधील शाही घराण्यावरील आगामी मालिका सर्वाधिक लोकप्रिय मालिका ठरावी यासाठी मालिकेची टीम खूप मेहनत घेताना दिसतेय. या मालिकेचा संबंध पंजाबशी असल्याने या मालिकेत मुख्य भूमिका साकारणारा शालीन भानोत या अभिनेत्याने नुकतीच अमृतसरमधील सुवर्णमंदिराला भेट दिली.शालीन भानोत या मालिकेत महाराजा रणजितसिंग यांचे वडील महासिंग यांची भूमिका साकरणार आहे. महाराजा रणजितसिंग यांनीच सुवर्णमंदिरात ‘लंगर’ची (भक्तांना मोफत जेवण) प्रथा सुरू केली होती. त्यामुळे या मालिकेचे नाते केवळ पंजाबच्या भूमीशीच आहे असे नव्हे, तर ते थेट सुवर्णमंदिराशीही जुळले गेले आहे.या भेटीविषयी शालीन भानोतकडे विचारणा केली असता, तो म्हणाला, “मी प्रथमच मालिकेत एका सरदाराची भूमिका साकारणार असल्याने मी बाबाजींचे आशीर्वाद घेण्यासाठी सुवर्णमंदिराला भेट दिली. आमच्या मालिकेतील सा-या  कलाकारांची सुवर्णमंदिरावर नितांत श्रध्दा असल्यामुळे मी त्यांच्यासाठी खडा प्रसाद बरोबर आणला. तसेच मी तिथून एक  हातात घालायचे कडं ही विकत घेतले आहे. जे मी या मालिकेत वापरणार आहे. ते माझ्यासाठी लकीचार्म ठरेल अशी आशा वाटत असल्याचे शालीनने सांगितले.

Web Title: So actor Shalin Bhanot gave a gift to Golden Temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.