'चला हवा येऊ द्या' फेम स्नेहल शिदमला हवाय असा जोडीदार, वडिलांनीच केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 16:08 IST2023-06-20T16:08:15+5:302023-06-20T16:08:44+5:30
Snehal Shidam : 'चला हवा येऊ द्या' शोमधून स्नेहल शिदम घराघरात पोहचली आहे.

'चला हवा येऊ द्या' फेम स्नेहल शिदमला हवाय असा जोडीदार, वडिलांनीच केला खुलासा
झी मराठी वाहिनीवरील रिएलिटी शो चला हवा येऊ द्या(Chala Hawa Yeu Dya)मधून अनेक कलाकारांचे नशीब पालटले. या कलाकारांपैकी एक कलाकार म्हणजे स्नेहल शिदम (Snehal Shidam). या शोमधून स्नेहलच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. तिने या शोमध्ये आपल्या विनादी अभिनय कौशल्य शैलीने रसिकांच्या मनात घर केले. हलाखीच्या परिस्थितीत बालपण गेलेल्या स्नेहल शिदमला मिळालेले यश पाहून वडिलांना खूप आनंद झाला. तिचा घरात आर्थिक गोष्टीत खूप मोठा आधार लाभतो. त्यामुळे तिच्या वडिलांना तिचा खूप अभिमान वाटतो. आता तिने लग्न करावे, अशी वडिलांची इच्छा आहे.
फादर्स डेच्या निमित्ताने स्नेहल शिदमच्या बाबांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत त्यांनी स्नेहलला कसा नवरा हवा आहे, याचा खुलासा केला. तिच्या वडिलांना जावई कोकणातला हवा आहे. ते म्हणाले की, आम्ही कोकणातली माणसं, इंजिनिअरसारखी स्नेहलसाठी आजवर अनेक स्थळे आली. पण आपल्याला एवढी मोठी माणसे अजिबात नको. तो मुलगा फक्त कोकणातला असावा अशी माझी अट आहे. याशिवाय स्नेहल ही ज्या क्षेत्रात काम करते, त्या क्षेत्रात कसं काम करावं लागतं हे आपण पाहतोच. त्याने तिच्या कामाकडे पाहून तिला वेळोवेळी समजून घेतले पाहिजे. तिला आमच्या कुटुंबाला आणि त्याच्या कुटुंबालाही त्याने समजून घ्यावे आणि एकत्र राहावे.
स्नेहलने लग्न करावे, अशी माझी इच्छा आहे
स्नेहलचे बाबा पुढे म्हणाले की, स्नेहलचे लग्न झाले की मी गावी जायला मोकळा होईन. मला तिच्या लग्नाचीच काळजी आहे, आता तिचे २६ वय संपेल त्यामुळे तिने लग्न करावे अशी माझी इच्छा आहे. स्नेहलचे लग्न झाले की तिच्या भावाचेही लग्न उरकून देणार आहोत. त्यानंतर मी माझ्या बायकोसोबत गावी राहायला मोकळा होईल.
मी पदवीधर आहे, त्यामुळे...
वडिलांच्या म्हणण्यावर स्नेहल शिदम सांगते की, बाबा जसे म्हणतात की मी लवकर लग्न करावे. पण अजून किमान दोन वर्षे तरी मी त्यासाठी वाट पाहणार आहे. बाबा लग्न कर म्हणून सतत माझ्या मागे लागलेले असतात. लग्नाबद्दल माझ्या काही फारशा अपेक्षा नाहीत, पण मी पदवीधर आहे. त्यामुळे मुलगासुद्धा पदवीधर असावा.