Bigg Boss 12 : स्नेहा वाघ म्हणते, 'बिग बॉस'मधील हा व्यक्ती आहे 'लंबी रेस का घोडा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2018 16:00 IST2018-09-28T15:59:08+5:302018-09-28T16:00:45+5:30
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री स्नेहा वाघ 'बिग बॉस' सीझन १२ सिंगल स्पर्धक व जोड्यांमुळे पाहत नाही तर ती बॉलिवूडचा दबंग खान सलमानसाठी पाहत असल्याचे तिने सांगितले.

Bigg Boss 12 : स्नेहा वाघ म्हणते, 'बिग बॉस'मधील हा व्यक्ती आहे 'लंबी रेस का घोडा'
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री स्नेहा वाघ 'बिग बॉस' सीझन १२ सिंगल स्पर्धक व जोड्यांमुळे पाहत नाही तर ती बॉलिवूडचा दबंग खान सलमानसाठी पाहत असल्याचे तिने सांगितले.
हिंदी लोकप्रिय रिएलिटी शो 'बिग बॉस'चा बारावा सीझन काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या शोचे सूत्रसंचालन सलमान खान करतो आहे. छोट्या पडद्यावरील अभिनेत्री स्नेहा वाघ हिने बिग बॉस सिंगल स्पर्धक व जोड्यांमुळे पाहत नाही तर सलमान खानमुळे पाहत असल्याचे सांगितले आहे. ती म्हणाली की, 'बऱ्याच वर्षांपासून मी बिग बॉस हा रिएलिटी शो पाहते आहे. पण, यामागे कारण आहे फक्त सलमान खान. मला तो खूप आवडतो. तो शोमध्ये वास्तविक रुपात असतो. जर तो भडकला तर ते लपवत नाही. तसेच तो स्पर्धकांबद्दल आपुलकी किंवा प्रेम वाटत असेल तरी ते देखील तो व्यक्त करतो. तो बिग बॉसमध्ये लंबी रेस का घोडा हैै. जर तो या शोमध्ये नसेल तर मला हा शो पाहण्यात अजिबात रस नाही.'
बिग बॉस ११चा फॉरमॅट चांगला आहे. यात सहभागी झालेले स्पर्धक खेळासाठी तयार वाटत असून आता त्यांच्याबद्दल मत सांगणे योग्य ठरणार नाही, असे स्नेहा म्हणाली व पुढे सांगितले की, 'श्रीसंत माझा फेव्हरेट नाही पण त्यालादेखील या शोमध्ये जास्त काळ पाहायला आवडेल. या स्पर्धकांमध्ये तोच आहे जो माझे लक्ष वेधून घेतो. '