मेरे साई या मालिकेत स्नेहा वाघ दिसणार या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 06:00 IST2018-07-17T17:38:07+5:302018-07-18T06:00:00+5:30

मेरे साई या मालिकेत नुकतीच स्नेहा वाघ दाखल झाली आहे. या मालिकेत काम करायला मिळत असल्याने स्नेहा वाघ सध्या चांगलीच खूश आहे. ती या मालिकेत तुळसा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

sneha wagh in mere sai | मेरे साई या मालिकेत स्नेहा वाघ दिसणार या भूमिकेत

मेरे साई या मालिकेत स्नेहा वाघ दिसणार या भूमिकेत

जगभरातील साईभक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील मेरे साई मालिका आस्थेने बघत आहेत आणि त्यातील कथानक, कथेची मांडणी याचे कौतुक करत आहे. शिर्डी येथील साईंच्या समधीला 100 वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या मालिकेची सुरुवात झाली होती. या मालिकेत अबीर सुफी साईबाबांची भूमिका साकारत असून त्याचा अभिनय प्रेक्षकांना चांगलाच भावत आहे. या मालिकेच्या कथानकाला लवकरच एक वळण मिळणार. या मालिकेत प्रेक्षकांना एक नवीन कलाकार दिसणार असून ही कलाकार छोट्या पडद्यावरची प्रसिद्ध कलाकार आहे. 
मेरे साई या मालिकेत नुकतीच स्नेहा वाघ दाखल झाली आहे. या मालिकेत काम करायला मिळत असल्याने स्नेहा वाघ सध्या चांगलीच खूश आहे. ती या मालिकेत तुळसा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. तुळसा ही म्हाळसापतीची बहीण आहे, जी शिर्डीला येते. स्नेहा स्नेहा वाघने ज्योती, वीरा यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. ती नुकतीच शेर ए पंजाब- महाराजा रंजित सिंग या मालिकेत काम करत होती. आता ती मेरे साई या लोकप्रिय मालिकेत काम करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिच्या भूमिकेबाबत विचारले असता ती सांगते, “मेरे साई मध्ये तुळसाची भूमिका साकारण्यासाठी मी उत्साहित आहे. तुळसा ही म्हाळसापतीची बहीण आहे, जो साईंचा निष्ठावान अनुयायी आहे. तिचे व्यक्तिमत्व गूढ आहे. ती शिर्डीला आलेली आहे आणि काहीशी हरवलेली आहे. ती साईंकडे कशी जाते आणि साई तिला तिच्या जीवनात कशी मदत करतात त्याची कथा रोचक आहे. मी व्यक्तिशः साईंची भक्त आहे आणि अशा काही घटना घडल्या आहेत की, जीवनातील काही कठीण प्रसंगी त्यांच्या कृपेने आणि आशीर्वादाने मला सावरले आहे. अशा सुंदर मालिकेचा भाग होताना मी खूप भाग्यवान असल्याची जाणीव होत आहे. मी माझ्या भूमिकेला न्याय देऊ शकेन अशी मला आशा आहे.”
मेरे साई या मालिकेतील स्नेहाची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावेल अशी या मालिकेच्या टीमला खात्री आहे. 

Web Title: sneha wagh in mere sai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.