या अवस्थेतही शालिन भानोतने केले मालिकेचे चित्रिकरण पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 14:09 IST2017-04-19T08:39:08+5:302017-04-19T14:09:08+5:30

कलाकरांना कडक उन्हातही ठरलेल्या शेड्युअलप्रमाणे मालिकांचे चित्रिकरण पूर्ण करावे लागते “आता उन्हाळा चांगलाच जाणवू लागला असून अशा तप्त वातावरणात ...

In this situation, Shalin Bhanot did the complete filming of the series | या अवस्थेतही शालिन भानोतने केले मालिकेचे चित्रिकरण पूर्ण

या अवस्थेतही शालिन भानोतने केले मालिकेचे चित्रिकरण पूर्ण

ाकरांना कडक उन्हातही ठरलेल्या शेड्युअलप्रमाणे मालिकांचे चित्रिकरण पूर्ण करावे लागते “आता उन्हाळा चांगलाच जाणवू लागला असून अशा तप्त वातावरणात बाहेर चित्रीकरण करणं ही खूप दमवून टाकणारी गोष्ट आहे. तेव्हा मी सकाळी सात ते रात्री सात या वेळेत चित्रीकरण करीत होतो. यावेळेत मी एकदाच ब्रेक घेतला, तोसुध्दा मला चक्कर येऊ लागली म्हणून. तेव्हा मी जेवून घेतलं आणि शरीराला लागणारं पाणी प्यायलो. सुदैवाने मला सहकार्य करणारी टीम मिळाली असून त्यांनी मला वेळोवेळी पाणी आणि इतर द्रवपदार्थ आणून दिले. माझ्या अनुभवावरून मी इतरांना विनंती करतो की सर्वांनी अशा वातावरणात भरपूर पाणी प्या. अन्यथा निर्जलीकरणाचा (डिहायड्रेशन) शरीरावर गंभीर विपरित परिणाम होईल.” सध्या रणजितसिंग वयाने लहान असल्याने मालिकेचे नायकाची जबाबदारी शालीन सांभाळतो आहे. त्याच्या मध्यवर्ती भूमिकेमुळे तो मालिकेच्या बहुतेक सर्वच प्रसंगात दिसतो आणि त्यासाठी त्याला दीर्घ काळ शूटिंग करावे लागते. त्याचे बहुतेक प्रसंग हे मोकळ्या मैदानात होत आहे. त्यात कडक उन्हात शूटिंग केल्यामुळे त्याच्या तब्येत खराब झाली त्याला खूप ताप होता.शरीरातील पाण्याचे प्रमाण घटले आहे. त्याला अशक्त वात होते शालीनला शूटिंग करणेही शक्य नव्हते.मात्र तरीही शालीनने आजारी असतानाही तब्बल 15 किलो वजनाची वेशभूषा परिधान केले होते.तशाही परिस्थितीत शालीनने या भागाचे चित्रीकरण पूर्ण केले.कितीही अवघड परिस्थिती असो,पण एक अभिनेता म्हणून शालीनने नवे उदाहरण प्रस्थापित केले आहे.‘शेर-ए- पंजाब : महाराजा रणजितसिंग’ या भव्य ऐतिहासिक मालिकेत रणजितसिंग यांचे वडील महासिंग यांच्या भूमिका साकारत आहे.

Web Title: In this situation, Shalin Bhanot did the complete filming of the series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.