भाभीजी घर पर है मालिकेतील या कलाकाराला मिळते सगळ्यात जास्त मानधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 12:25 IST2018-05-02T06:55:45+5:302018-05-02T12:25:45+5:30
भाभीजी घर पर है ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. या मालिकेतील अंगुरी भाभी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या ...
.jpg)
भाभीजी घर पर है मालिकेतील या कलाकाराला मिळते सगळ्यात जास्त मानधन
भ भीजी घर पर है ही मालिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. या मालिकेतील अंगुरी भाभी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेत ही व्यक्तिरेखा शिल्पा शिंदे साकारत होती. पण या मालिकेचे निर्माते आणि शिल्पा यांच्यात झालेल्या वादामुळे शिल्पा या मालिकेतून बाहेर पडली. सध्या या मालिकेत अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेत प्रेक्षकांना शुभांगी अत्रेला पाहायला मिळत आहे. शुभांगीची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. प्रेक्षकांनी तिला या भूमिकेत स्वीकारले असल्याने ती चांगलीच खूश आहे. या मालिकेतील अंगुरी-तिवारी,अनिता-विभुती या जोडप्यांसोबतच हप्पू, सक्सेना, टीका, मालखन आणि टिल्लू या सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या मालिकेत आसिफ शेख, सौम्या टंडन, शुभांगी अत्रे, रोहिताश गौड या मालिकेत मुख्य भूमिका साकारतात. या कलाकारांचे एका दिवसाचे मानधन किती आहे हे कळल्यावर तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल.
भाभीजी घर पर है या मालिकेत विभूतीची भूमिका साकारणाऱ्या आसिफ शेखला या मालिकेतील इतर कलाकारांपेक्षा जास्त मानधन मिळते. आसिफ शेखने त्याच्या आजवरच्या कारकिर्दीत अनेक मालिकांमध्ये, चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने छोट्या पडद्यावर आज त्याचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. आसिफने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात करून आज अनेक वर्षं झाली आहेत. हम लोग या प्रसिद्ध मालिकेद्वारे त्याने त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तो मेहेंदी तेरे नाम की, यस बॉस यांसारख्या अनेक मालिकांमध्ये झळकला. आजवर त्याच्या सगळ्याच भूमिकांचे कौतुक झाले आहे. याचसोबत तो अनेक वर्षं चित्रपटांमध्ये काम करत आहे. त्याने पहेली, जोडी नं १, कुवारा, बंधन, प्यार किया तो डरना क्या यांसारख्या चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्याला केवळ एका दिवसाचे ७० हजार रुपये मिळतात तर सौम्या टंडनला एका दिवसांचे ५५ हजार ते ६० हजार रुपये मिळतात तर शुभांगी अत्रेला एका दिवसासाठी ४० हजार रुपये मिळतात. शुभांगी पेक्षा अधिक मानधन या मालिकेत मनमोहन तिवारीची भूमिका साकारणाऱ्या रोहिताश गौडला मिळते. रोहिताशला दिवसाचे ५० ते ६० हजार रुपये मिळतात. यासोबतच दरोगा हप्पू सिंग म्हणजेच योगेश त्रिपाठीला ३५ हजार, अनोखेलाल सक्सेना म्हणजेच सानंद वर्माला १५ हजार टिका राम म्हणजेच वैभव माथुरला २५ हजार भुरे लालची भूमिका साकारणाऱ्या राकेश बेदीला २५ हजार इतके मानधन मिळते.
Also Read : 'भाभीजींचा..' चा गोव्यात दिसला ग्लॅमरस अंदाज!