​सारेगमपमध्ये परीक्षकाची भूमिका बजावणार गायक जावेद अली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2016 11:55 IST2016-12-26T11:55:39+5:302016-12-26T11:55:39+5:30

जावेद अलीने 2012मध्ये सारेगमप या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. त्याची सूत्रसंचालनाची स्टाईल सगळ्यांनाच खूप आवडली होती आणि आता जावेद ...

Singer Javed Ali will play a tester in Saregampam | ​सारेगमपमध्ये परीक्षकाची भूमिका बजावणार गायक जावेद अली

​सारेगमपमध्ये परीक्षकाची भूमिका बजावणार गायक जावेद अली

वेद अलीने 2012मध्ये सारेगमप या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते. त्याची सूत्रसंचालनाची स्टाईल सगळ्यांनाच खूप आवडली होती आणि आता जावेद या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केल्यानंतर या कार्यक्रमात तो परीक्षकाची भूमिका बजावणार आहे. 
जावेदने जोधा अकबर या चित्रपटात गायलेले जश्न-ए-बहारा, गजनी या चित्रपटात गायलेले गुजारिश हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. गेल्या काही वर्षांत जावेदच्या आवाजाने अनेकांवर भुरळ घातली आहे आणि आता जावेद पहिल्यांदाच एखाद्या कार्यक्रमाचे परीक्षण करणार आहे. या कार्यक्रमाविषयी तो खूपच उत्साहित आहे. जावेद सांगतो, "परीक्षकाच्या खुर्चीत बसणे हे सोपे नसते. पण तरीही मी या कार्यक्रमाचे परीक्षण करणे खूप एन्जॉय करत आहे. मी याआधी सारेगमप या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले आहे. सारेगमप या कुटुंबांचा पुन्हा भाग बनण्याचा मला खूप आनंद होत आहे. सारेगमपच्या 2012च्या पर्वातच स्पर्धकांचे आवाज ऐकून मी थक्क झालो होतो आणि आता तर मी स्पर्धकांचे आवाज ऐकून त्यावर प्रतिक्रिया देणार आहे. सध्या या कार्यक्रमाची ऑडिशन्स सुरू झाली आहेत. ऑडिशन्स देशातील विविध भागात घेतली जात आहेत. ऑडिशनला येणाऱ्या मुलांचे आवाज ऐकून कोणाकोणाची निवड करायची असा आम्हाला प्रश्न पडतो. सारेगमपने आतापर्यंत इंडस्ट्रीला अनेक चांगले गायक मिळवून दिले आहेत. या सिझनमधूनही काही चांगले गायक इंडस्ट्रीला मिळतील अशी मला आशा आहे." 
सारेगमप लिटिल चॅम्पस या कार्यक्रमाचे परीक्षण जावेद अलीसोबतच हिमेश रेशमिया आणि नेहा कक्करदेखील करणार आहेत. हिमेशने याआधीदेखील या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका बजावली होती. 

Web Title: Singer Javed Ali will play a tester in Saregampam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.