निवेदिता सराफ सांगतात, आसावरी आणि माझ्यात हे आहे साम्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 17:55 IST2019-12-23T17:43:02+5:302019-12-23T17:55:48+5:30

झी मराठीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या एका वेगळ्या आणि अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या.

This is similarity between me and asavari said nivedita saraf | निवेदिता सराफ सांगतात, आसावरी आणि माझ्यात हे आहे साम्य

निवेदिता सराफ सांगतात, आसावरी आणि माझ्यात हे आहे साम्य

झी मराठीवरील 'अग्गंबाई सासूबाई' या मालिकेतून ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ या एका वेगळ्या आणि अनोख्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आल्या. या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षक आसावरी या व्यक्तिरेखेला खूप पसंत करत आहे. आई, सून, सासू हि प्रत्येक भूमिका चोख बजावणारी आसावरी हि महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आणि त्यांच्या कुटुंबातीलच एक सदस्य बनली.सध्या मालिका रंजक वळणावर आली आहे. अभिजित राजे आणि आसावरी यांच्यातील मैत्रीच नातं दिवसेंदिवस दृढ होतंय. 

हि व्यक्तिरेखा साकारणाऱ्या जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांना त्यांच्या आणि आसावरीच्या व्यतिरेखेमधील साम्य विचारलं असताना त्या म्हणाल्या, "माझ्यात आणि आसावरीमध्ये २ साम्य आहेत. पहिलं म्हणजे आसावरीसाठी तिचं कुटुंब महत्वाचं आहे आणि माझ्यासाठी देखील माझं कुटुंब अग्रस्थानी येतं. दुसरं म्हणजे आसावरी एक उत्तम सुगरण आहे आणि तिच्यासारखंच मलासुद्धा स्वयंपाक करायला खूप आवडतो. मला जेवण करून खायला घालायला खूप आवडतं, खूप लोक माझ्या घरी माझ्या हातचं जेवून जातात त्यामुळे मी केलेला स्वयंपाक चांगला होत असावा असं मला वाटतं." 
 

Web Title: This is similarity between me and asavari said nivedita saraf