‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत गायक कुमार सानू करणार सिकंदरची मदत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2019 17:09 IST2019-02-17T17:09:09+5:302019-02-17T17:09:36+5:30
येत्या काही दिवसांत या विशेष भागाच्या प्रोमोसाठी आणि प्रत्यक्ष मालिकेतील भागासाठी कुमार सानू चित्रीकरण करणार आहे.

‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत गायक कुमार सानू करणार सिकंदरची मदत
गायक कुमार सानू याला ‘स्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ या मालिकेतील सर्वात मोठ्या रहस्याचा स्फोट करण्यासाठी समाविष्ट करण्यात आले आहे. कुल्फी ही आपलीच मुलगी आहे, हे सत्य मालिकेतील रॉकस्टार सिकंदर याला सांगण्यासाठी कुमार सानूची मदत घेण्यात येणार आहे.
सिकंदर हेच आपले खरे जन्मदाते आहेत, ही गोष्ट काही महिन्यांपूर्वीच कुल्फीला समजलेली असते. पण ती ही गोष्ट स्वत:पाशीच ठेवते आणि सिकंदरला त्याची माहिती देत नाही. आता कुमार सानूच्या मदतीने सिकंदरलाही हे सत्य
अखेरीस समजते. अभिनेता मोहित मलिक हा मालिकेत सिकंदरची भूमिका साकारीत असल्याने त्याचे दैवत असलेल्या कुमार सानू याच्यापेक्षा दुसरी कोणती व्यक्ती त्याला हे सत्य सांगण्यासाठी चांगली असेल?
येत्या काही दिवसांत या विशेष भागाच्या प्रोमोसाठी आणि प्रत्यक्ष मालिकेतील भागासाठी कुमार सानू चित्रीकरण करणार आहे.
‘कुल्फीकुमार बाजेवाला’ सोमवार ते शुक्रवार रात्री 8.30 वाजता फक्त ‘स्टार प्लस’वर पाहा.