OMG!! सिडनाजच्या ‘भूला दुंगा’ गाण्याने मोडला ‘वाका वाका’चा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2020 11:18 IST2020-05-07T11:14:54+5:302020-05-07T11:18:19+5:30

‘बिग बॉस’च्या 13 व्या सीझनमध्ये दिसलेली सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिल ही जोडी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर ट्रेंड करत होती. आताही चित्र वेगळे नाही. 

sidharth shukla and shehnaaz gill bhula dunga song breaks record shakira waka waka song-ram | OMG!! सिडनाजच्या ‘भूला दुंगा’ गाण्याने मोडला ‘वाका वाका’चा विक्रम

OMG!! सिडनाजच्या ‘भूला दुंगा’ गाण्याने मोडला ‘वाका वाका’चा विक्रम

ठळक मुद्दे‘भूला दुंगा’ हे गाणे दर्शन रावलने गायले होते. त्याचे मनाला थेट भिडणारे स्वर आणि सिडनाजची जबरदस्त केमिस्ट्री यामुळे हे गाणे लोकांना भावले.

बिग बॉस’च्या 13 व्या सीझनमध्ये दिसलेली सिद्धार्थ शुक्ला व शहनाज गिल ही जोडी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर ट्रेंड करत होती. आताही चित्र वेगळे नाही. होय, बिग बॉसच्या घरात तुफान लोकप्रिय झालेल्या या रोमॅन्टिक जोडीचे ‘भूला दुंगा’ हे गाणे सध्या तितकेच तुफान गाजतेय. इतकेच नाही तर या गाण्याने चक्क शकिराच्या गाण्याचा रेकॉर्ड मोडला आहे.
सिडनाजची जोडी आज लाखो लोकांची आवडती जोडी आहे. बिग बॉसच्या घरात या जोडीला प्रेक्षकांचे प्रचंड प्रेम मिळाले. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर ‘भूला दुंगा’ या गाण्यात या जोडीची रोमॅन्टिक केमिस्ट्री दिसली होती. सिडनाजचे हे गाणे सध्या जाम चर्चेत आहे. 24 मार्चला युट्यूबवर हे गाणे रिलीज झाले आणि बघता बघता या गाण्याने  शकिराच्या ‘वाका वाका’ या गाण्याचा विक्रम मोडला.

गेल्या 12 दिवसांमध्ये तब्बल 5 कोटी 90 लाख 40 हजारांपेक्षा अधिक लोकांनी हे गाणे पाहिले़. या गाण्यावर 10  लाखांपेक्षा अधिक कमेंट आल्या व एक अनोखा विक्रम रचला गेला. ‘भूला दुंगा’ या गाण्याने शकिराच्या ‘वाका वाका’ गाण्याला मागे टाकले. 2010 साली फिफा फुटबॉल विश्वचषकासाठी तयार करण्यात आलेल्या ‘वाका वाका’ या गाण्याने 10 दिवसांमध्ये जवळपास पाच कोटी व्हूज मिळवले होते. गेल्या 10 वर्षांत हा विक्रम कोणीही मोडू शकले नव्हते. मात्र ‘भूला दुंगा’ या गाण्याने  तब्बल 10 वर्षांनंतर का होईना ‘वाका वाका’चा विक्रम मोडला.

‘भूला दुंगा’ हे गाणे दर्शन रावलने गायले होते. त्याचे मनाला थेट भिडणारे स्वर आणि सिडनाजची जबरदस्त केमिस्ट्री यामुळे हे गाणे लोकांना भावले. या गाण्यासाठी सिडनाजने दोन दिवस सलग 16 तास शूट केले होते. तूर्तास लॉकडाऊनच्या काळात सिडनाज दोघेही सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहेत.

Web Title: sidharth shukla and shehnaaz gill bhula dunga song breaks record shakira waka waka song-ram