सिद्धी म्हणतेय... कुछ ना कहो
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2016 15:04 IST2016-09-28T09:34:45+5:302016-09-28T15:04:45+5:30
लव्ह लग्न लोचा या मालिकेत काम करणाऱ्या सिद्धी कारखानीसने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. ...
.jpg)
सिद्धी म्हणतेय... कुछ ना कहो
ल ्ह लग्न लोचा या मालिकेत काम करणाऱ्या सिद्धी कारखानीसने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर एक व्हिडिओ अपलोड केला आहे. या व्हिडिओमध्ये सिद्धी कुछ ना कहो... हे गाणे गाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या व्हिडिओविषयी सिद्धी सांगते, "आम्ही रात्रीच्या वेळात मालिकेचे चित्रीकरण करत होतो. काही केल्या वेळ जातच नव्हता. मी आणि रुचिताने मेकअप रूममध्ये आशिकी या चित्रपटाच्या गाण्यावर नृत्यदेखील केले. पण रुचिताचा शॉर्ट लागल्यानंतर ती चित्रीकरणासाठी गेली. त्यावेळी मेकअपरूममध्ये एकटी बसून मी पूर्ण कंटाळली होती. त्यामुळे मी कुछ ना कहो... हे गाणे गायले आणि त्याचा व्हिडिओदेखील रेकॉर्ड केला. खरे तर एक टाईमपास म्हणून मी हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता. पण माझ्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद मला या व्हिडिओला मिळत आहे. माझा आवाज खूप छान असल्याचेही अनेकांनी कमेंट्समध्ये लिहिले आहे."
I know I can't sing, but what else to do when you have night shift and your shot is not ready.......
Web Title: Siddhi says ... do not say anything
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.