"अपून फिरसे मामा बनेगा...", भारती सिंगने गुडन्यूज दिल्यानंतर 'लाफ्टर क्वीन'साठी सिद्धार्थ जाधवची खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 17:36 IST2025-10-08T17:36:12+5:302025-10-08T17:36:52+5:30
सेलिब्रिटींनीही भारती आणि हर्ष लिंबाचियाचं अभिनंदन केलं होतं. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने भारती आणि हर्षसाठी खास पोस्ट केली आहे.

"अपून फिरसे मामा बनेगा...", भारती सिंगने गुडन्यूज दिल्यानंतर 'लाफ्टर क्वीन'साठी सिद्धार्थ जाधवची खास पोस्ट
लाफ्टर क्वीन भारती सिंगने नुकतीच गुडन्यूज दिली आहे. भारती सिंग दुसऱ्यांदा आई होणार आहे. सोशल मीडियावरुन ही गोड बातमी भारतीने चाहत्यांसोबत शेअर केली होती. तिच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत भारतीला शुभेच्छाही दिल्या होत्या. सेलिब्रिटींनीही भारती आणि हर्ष लिंबाचियाचं अभिनंदन केलं होतं. मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने भारती आणि हर्षसाठी खास पोस्ट केली आहे.
भारती आणि हर्ष पुन्हा आईबाबा होणार असल्याचं समजल्यानंतर सिद्धार्थचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. सिद्धार्थने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हर्ष आणि भारतीचा फोटो शेअर करत त्याचा आनंद व्यक्त केला आहे. "अपून फिरसे मामा बनेगा...भारती आणि हर्ष तुमचं अभिनंदन", असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. भारतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हर्ष लिंबाचियासोबतचा खास फोटो पोस्ट करत "आम्ही पुन्हा एकदा प्रेग्नंट आहोत" असं कॅप्शन देऊन ही गुडन्यूज दिली. या फोटोमध्ये भारतीने तिचा बेबी बंपही फ्लॉन्ट केला. आता लवकरच त्यांच्या आयुष्यात एका नव्या सदस्याचं आगमन होणार आहे.
भारती सिंग आणि हर्ष लिंबाचियाने २०१७ मध्ये लग्नगाठ बांधली. ३ एप्रिल २०२२ रोजी त्यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली.त्यांच्या मुलाचं नाव लक्ष्य आह., पण त्याला सगळेच लाडाने गोला म्हणून हाक मारतात. भारतीचा मुलगा गोला लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. आता लग्नाच्या आठ वर्षानंतर भारती दुसऱ्यांदा मातृत्व अनुभवणार आहे.