​सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती जाधव झाले नच बलियेमधून बाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2017 17:45 IST2017-04-19T12:15:05+5:302017-04-19T17:45:05+5:30

सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती जाधव ही मराठमोळी जोडी प्रेक्षकांना नच बलिये या कार्यक्रमात पाहायला मिळाली होती. पण सिद्धार्थच्या फॅन्ससाठी ...

Siddharth Jadhav and Trupti Jadhav became Nach Baliye | ​सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती जाधव झाले नच बलियेमधून बाद

​सिद्धार्थ जाधव आणि तृप्ती जाधव झाले नच बलियेमधून बाद

द्धार्थ जाधव आणि तृप्ती जाधव ही मराठमोळी जोडी प्रेक्षकांना नच बलिये या कार्यक्रमात पाहायला मिळाली होती. पण सिद्धार्थच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. सिद्धार्थ आणि तृप्ती नच बलिये या कार्यक्रमातून नुकतेच बाद झाले आहेत. सिद्धार्थने आज मराठी इंडस्ट्रीसोबतच हिंदी इंडस्ट्रीतदेखील आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. गोलमाल या चित्रपटात तो एका महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. त्यानंतर त्याने कॉमेडी सर्कस या मालिकेत त्याची कॉमिक टायमिंग दाखवून दिली होती. मराठी चित्रपटात तर त्याने एकापेक्षा एक सरस भूमिका साकारल्या आहेत. मराठी इंडस्ट्रीतील एक उत्कृष्ट अभिनेता म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. 
सिद्धार्थ छोट्या पडद्यावर अनेक कार्यक्रमात झळकला असला तरी कॅमेऱ्यासमोर येण्याची तृप्तीची ही पहिलीच वेळ होती. पण तरीही तृप्तीने सिद्धार्थला चांगलीच साथ दिली. त्यांचा नच बलियेमधील पहिला परफॉर्मन्स तर परीक्षक आणि प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. पण परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मते कमी मिळाल्यामुळे त्यांना प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागला.  
सिद्धार्थ आणि तृप्ती यांनी या कार्यक्रमातील पहिल्या भागात अतिशय चांगला परफॉर्मन्स सादर करून ते चांगले नर्तक असल्याचेदेखील सिद्ध केले होते. या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना तृप्ती आणि सिद्धार्थची केमिस्ट्री अनुभवायला मिळाली होती. 
नच बलिये या कार्यक्रमाचे पहिल्या सिझनचे विजेते सचिन पिळगांवकर आणि सुप्रिया पिळगांवकर ठरले होते. तर गेल्या सिझनमध्ये अमृता खानविलकर आणि हिमांशू मल्होत्राने नच बलियेचे विजेतेपद मिळवले होते. त्यामुळे यंदादेखील सिद्धार्थ आणि तृप्ती ही मराठमोळी जोडी प्रेक्षकांचे मन जिंकेल आणि विजेते ठरतील असेच सगळ्यांना वाटले होते. 


Web Title: Siddharth Jadhav and Trupti Jadhav became Nach Baliye

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.