सिया के राम फेम मदिराक्षी मुंडळे झळकणार जाट की जुगनी या मालिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2017 14:41 IST2017-03-14T09:11:48+5:302017-03-14T14:41:48+5:30
सिया के राम या मालिकेत मदिराक्षी मुंडळेने साकारलेली सीतेची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. ही मालिका तिची पहिलीच मालिका ...
सिया के राम फेम मदिराक्षी मुंडळे झळकणार जाट की जुगनी या मालिकेत
स या के राम या मालिकेत मदिराक्षी मुंडळेने साकारलेली सीतेची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. ही मालिका तिची पहिलीच मालिका असली तरी या मालिकेने तिला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही मालिका संपल्यानंतर मदिराक्षी कोणत्या मालिकेत झळकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली होती. मदिराक्षी आता जाट की जुगनी या मालिकेत काम करणार असून तिचे एक वेगळेच रूप प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
जाट की जुगनी या मालिकेत मदिराक्षी मुन्नी या हरयाणवी मुलीची भूमिका साकारणार असून या भूमिकेसाठी ती सध्या खूपच उत्सुक आहे. ती या मालिकेत बिट्टू म्हणजेच विशाल वशिष्टच्या प्रेयसीची भूमिका साकारणार आहे. या मालिकेतील प्रेमकथा ही इतर प्रेमकथांपेक्षा थोडीशी हटके असणार आहे. या भूमिकेविषयी मदिराक्षी सांगते, "ही भूमिका साकारताना मी अभिनय करत आहे असे मला अजिबातच वाटत नाही. मी माझे वास्तविक जीवनच जगत आहे असेच मला वाटते. मुन्नी ही अतिशय साधी, निरागस आणि अत्यंत लाजाळू अशी मुलगी दाखवली आहे. मी खऱ्या आयुष्यात काहीशी अशीच आहे. मी सिया के राम या पौराणिक मालिकेत काम केले होते. पण मुन्नी ही भूमिका मी सिया के राममध्ये साकारलेल्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. मी जाट की जुगनी या मालिकेत एका हरयाणवी मुलीची भूमिका साकारत आहे. पण खऱ्या आय़ुष्यात मी हरयाणवी नसल्याने ही भूमिका साकारणे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. ही भूमिका चांगल्याप्रकारे साकारता यावी यासाठी मी चित्रीकरणादरम्यान हरियाणामधील स्थानिक महिलांसोबत वेळ घालवला आहे. या भूमिकेसाठी सध्या मी खूप मेहनत घेत आहे."